Chandrakant Khaire | “शिवसेना प्रमुखांचं शेवटचं भाषण आठवा…”; चंद्रकांत खैरेंचा एकनाथ शिंदेंना सल्ला

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) आज पत्रकारांशी बोलते होते. त्यावेळी बोलताना बाळासाहेब ठाकरे कधीही एकनाथ शिंदेंना माफ करणार नाहीत, असे वक्तव्य केले आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आज मुंबईतील शिवाजी पार्क येथे दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या (Memorial Balasaheb Thackeray) कामाची पाहणी करणार होते. त्यासंबंधी चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी हे वक्तव्य केले आहे.

 

चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) म्हणाले,’ बाळासाहेब ठाकरेंनी कष्ट आणि संघर्ष करून शिवसेना उभी केली. पहिल्यांदा मराठी माणसाला एकत्र आणले नंतर हिंदुत्वासाठी त्यांनी सर्वांना एकत्र केले. ‘गर्व से कहो हम हिंदू है’ अशी घोषणा दिली. तुम्ही त्यांचीच शिवसेना फोडली, एक गट तयार करून बंडखोरी केली. अशी बंडखोरी बाळासाहेबांना कधीच मान्य नव्हती. बाळासाहेबानं विरोधात ज्यांनी कोणी बंडखोरी केली ते कधीच निवडून आले नाहीत. हा जगदंबेचा कोप आहे.’

 

‘शिवसेना प्रमुखानी केलेल्या शेवटच्या भाषणात त्यांनी सांगितलं होत की माझ्या उद्धवला (Uddhav Thackeray) आणि आदित्यला (Aditya Thackeray) सांभाळा.
पण तुम्ही तोच आदेश पाळत नाही दहा वर्ष पाळल्या नंतर आता काहीतरी कारणं देत त्याला छेद देताय.
तुम्हाला मोठी मोठी पद दिले असताना सुद्धा तुम्ही त्यांच्याशी गद्दारी केली हे शिवसैनिकांना पटणार नाही.
जर तुम्हाला बाळासाहेबांची भेट घ्यायची असेल तर मन स्वच्छ ठेवा आणि तिथं जाऊन बाळासाहेबांची माफी मागा.’
असेही चंद्रकांत खैरे म्हणाले.

 

Web Title :- Chandrakant Khaire | “Recall Shiv Sena chief’s last speech…”; Chandrakant Khair’s advice to Eknath Shinde

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Prakash Ambedkar | मुख्यमंत्री भेटून गेल्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी साधला माध्यामांशी संवाद, म्हणाले…

Eknath Khadse | साधना महाजन तुमच्या कुटुंबातीलच आहेत ना? – एकनाथ खडसे

Urfi Javed | आंतरराष्ट्रीय ग्लॅमर वर्ल्डमध्ये चालली उर्फी जावेदची जादू, होतेय टेलर स्विफ्टच्या फॅशनची चर्चा