Chandrakant Patil | ‘एखादा चित्रपट तुम्हाला आवडला नाही तर चित्रपटगृहाबाहेर गळ्यात पाट्या लावून उभे राहा’ – चंद्रकांत पाटील

मुंबई: पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड (Dr. Jitendra Awhad) यांना ठाण्यातील एका मॉलमधील चित्रपट बंद पाडल्याप्रकरणी आणि प्रेक्षकांना मारहाण केल्याप्रकरणी वर्तक नगर पोलिसांकडून (Vartak Nagar Police Station) अटक करण्यात आली आहे. त्यावर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी प्रतिक्रिया देत आव्हाडांवर टीका केली आहे. एखादा चित्रपट तुम्हाला आवडला नाही, तर चित्रपटगृहाबाहेर गळ्यात पाट्या लावून उभे राहा, असे चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले.

एखादा चित्रपट तुम्हाला आवडला नाही, तर चित्रपटगृहाबाहेर गळ्यात पाट्या लावून उभे राहा. आणि चित्रपट पाहू नका, असे लोकांना सांगा. कायदा हातात घेतल्यानंतर जी शिक्षा व्हायची ती होणारच आहे. तुम्हाला एखादा विषय आवडला नाही, हा संघर्षाचा विषय आहे का? सरकार सत्तेतून गेल्याने रोज उठसूठ उठून आव्हाड संघर्ष करत आहेत.
रोज नवा संघर्ष करण्याचा आव्हाडांचा प्रयत्न आहे, असे देखील चंद्रकांत पाटील (Chanrakant Patil) म्हणाले.
‘हर हर महादेव’ चित्रपटात इतिहासाची मोडतोड झाल्याचा दावा काही संघटना आणि इतिहास अभ्यासकांनी केला आहे. त्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि संभाजी ब्रिगेड आघाडीवर आहे.
तसेच इतिहास संशोधक आणि अभ्यासक डॉ. श्रीमंत कोकाटे, इद्रजित सावंत यांनी देखील या चित्रपटाला विरोध केला आहे.
त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली होती.
संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chatrapati) यांनी देखील या चित्रपटाला विरोध केला आहे.
त्यामुळे हा वाद चिघळला होता.

जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांनी ठाण्यातील विवियाना मधील चित्रपटाचा प्रयोग बंद पाडला होता.
तसेच तेथील प्रेक्षकांना देखील मारहाण केली होती. त्यानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
त्यांच्या अटकेचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून निषेध केला गेला आहे.

Web Title :-  Chandrakant Patil | bjp leader chandrakant patil commented on jitendra avhad arrest after action on har har mahadev movie

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

SSC, HSC Exam 2023 | दहावी आणि बारावीला बाहेरून फॉर्म भरणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मंडळाचा मोठा दिलासा

Pune Crime | भरधाव दुचाकीच्या धडकेत रस्ता ओलांडणाऱ्या पोस्टमनचा मृत्यू