SSC, HSC Exam 2023 | दहावी आणि बारावीला बाहेरून फॉर्म भरणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मंडळाचा मोठा दिलासा

पुणे: पोलीसनामा ऑनलाईन – SSC, HSC Exam 2023 | महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने विद्यार्थ्यांच्या हिताचा मोठा निर्णय घेतला आहे. आता दहावी (SSC) आणि बारावीला (HSC) बाहेर फॉर्म भरणाऱ्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. या मुदतवाढ नुसार 14 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर दरम्यान फक्त शाळांमार्फत फॉर्म भरता येणार आहेत. राज्य मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च 2023 च्या परीक्षेसाठी खासगीरित्या (Form No 17) सहभाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आधीची तारीख 1 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर निश्चित करण्यात आला होती.

पण आता त्यांना 20 रुपये प्रतिदिन प्रति विद्यार्थी प्रमाणे अतिविलंब शुल्क भरून येणाऱ्या परीक्षेसाठी  नाव नोंदणी करता येणार आहे. कोणताही अर्ज ऑफलाईन घेतला जाणार नाही. केवळ ऑनलाईन अर्ज स्वीकारले जातील. सर्व शाळा महाविद्यालयांना विद्यार्थ्यांची मदत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

दहावीचे विद्यार्थी form17.mh-ssc.ac.in वर फॉर्म भरू शकतात. तर बारावीसाठी form17.mh-hsc.ac.in या
संकेत स्थळावर जाऊन फॉर्म भरू शकतात. हा फॉर्म भरण्यासाठी शाळा सोडल्याचा दाखला, आधार कार्ड,
पासपोर्ट साईझ फोटो आवश्यक आहे.
या मुदतवाढी व्यतिरिक्त इतर कोणतीही मुदत वाढ होणार नसल्याचे मंडळाने स्पष्ट केले आहे.

Web Title :-  SSC, HSC Exam 2023 | important news for students 10th 12th 17 number application deadline extension SSC, HSC Exam 2023

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Jayant Patil On Jitendra Awhad | ‘जितेंद्र आव्हाड यांच्या भूमिकेशी राष्ट्रवादी काँग्रेस सहमत’ – प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील

Chandrakant Khaire | किर्तिकरांना म्हातारचळ लागलय, चंद्रकांत खैरेंचा शेलक्या शब्दात हल्लाबोल

Narendra Modi Stadium | काँग्रेस नरेंद्र मोदी स्टेडीयमचे नाव बदलणार; निवडणूक जाहीरनाम्यात आश्वासन