Chandrakant Patil | पुणे मेट्रोचा पहिला टप्पा मार्च 2023 पर्यंत होणार पूर्ण – चंद्रकांत पाटील

पुणे : वृत्तसंस्था – पुणे मेट्रोचा पहिला टप्पा मार्च 2023 पर्यंत पूर्ण होईल. मेट्रोच्या तीनही टप्प्यांना गती देण्यात येत असून, त्यातील दोन टप्प्यांचे प्रस्ताव केंद्र शासनाच्या मंजुरीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी दिली. शुक्रवारी चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी मेट्रोच्या कामांची पाहणी केल्यानंतर ते बोलत होते.

यावेळी पाटलांनी शिवाजीनगर येथील भूमिगत मेट्रो स्थानकाची पाहणी केली. तसेच गरवारे महाविद्यालय मेट्रो स्थानक येथे पाहणी करून तिकीट घेत त्यांनी वनाज मेट्रो स्थानकापर्यंत मेट्रोने प्रवास केला. आमदार भीमराव तापकीर, माधुरी मिसाळ, सुनील कांबळे, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. शिवाजीनगर भूमिगत मेट्रो स्थानकाची पाहणी केल्यानंतर डॉ. दीक्षित यांच्यासह पुणे मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी प्रकल्पाच्या प्रगतीचे संगणकीय सादरीकरण पाटलांसमोर केले.

पाटील म्हणाले, शहराची वाढत्या वाहतुकीची गरज पाहता रस्ते, उड्डाणपूल आदी प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत.
मेट्रोचे काम पूर्ण झाल्यावर शहरातील गर्दी मेट्रोमध्ये स्थलांतरित होईल.
परिणामी रस्त्यांवरील वाहतूक कोंडीचा त्रास कमी होईल.
पुणे मेट्रोचे काम गतीने सुरू असून, 33 किलोमीटर लांबीचा एक टप्पा मार्च 2023 पर्यंत महामेट्रोकडून पूर्ण
करण्यात येईल. प्रवासी वाहतूक गतीने होण्याचे उद्दिष्ट आम्ही डोळ्यांसमोर ठेवले आहे. प्रत्येक स्थानक वेगवेगळ्या संकल्पनेनुसार तयार करण्यात आले आहे. त्यामुळे शहराच्या सौंदर्यीकरणातही भर पडेल.

Web Title :- Chandrakant Patil | phase one of metro completed by march end minister chandrakant patil information pune

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Mumbai Crime | खारमध्ये डिलिव्हरी बॉयने घरात घुसत केला महिलेचा विनयभंग

TikTok Star Megha Thakur | टिक टॉक स्टार मेघा ठाकूरचं 21 व्या वर्षी निधन