Chandrakant Patil | मराठा समाजातील विद्यार्थ्यांना एससी, एसटी, ओबीसी प्रमाणे निर्वाह भत्ता मिळणार, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मराठा समाजातील (Maratha Community) विद्यार्थ्यांना सामाजिक न्याय विभागाच्या (Department of Social Justice) निकषानुसार एससी (SC), एसटी (ST), ओबीसी (OBC) या प्रवर्गातील विद्यार्थ्यांप्रमाणे वर्षाला 60 हजार रुपये निर्वाह भत्ता (Subsistence Allowance) देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी दिली. छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी-SARTHI) या अंतर्गत वसतीगृह, शिष्यवृत्ती योजनांच्या अंमलबजावणीबाबत मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला

चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले, मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी सारथी संस्थेने सर्व जिल्ह्यांमध्ये डिसेंबर पासून 100 मुलांचे वसतीगृह (Hostel) सुरु होईल यांचे कालबद्ध नियोजन करावे, तसेच याबाबत विभागीय स्तरावर आढावा घेऊन या कामाला गती द्यावी तसेच वसतीगृहासाठी आवश्यक नियमावली तयार करावी. यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभाग, सारथी, महाज्योती, संबंधित जिल्हाधिकारी यांनी एकत्रित बैठक घेऊन अंतिम नियमावली सादर करावी, असे निर्देश पाटील यांनी यावेळी दिले.

केंद्र सरकारच्या (Central Government) एनसीईआरटीमार्फत (NCERT) घेतल्या जाणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण झालेले व शिष्यवृत्ती न मिळालेल्या लक्षित गटातील विद्यार्थ्यांना सारथीमार्फत दरमहा 800 प्रमाणे वार्षिक 9 हजार 600 रुपये लाभ देणारी छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यात आली आहे.
तसेच देशांतर्गत उच्च शिक्षणासाठी डॉ. पंजाबराव देशमुख सारथी उच्च शिक्षण योजना
(Dr. Punjabrao Deshmukh Sarathi Higher Education Scheme) सुरू करण्यात आली आहे.
या योजनेअंतर्गत देशातील 200 नामांकित राज्याबाहेरील विद्यापीठ, संस्थांमध्ये प्रवेश घेणाऱ्या महाविद्यालयीन
विद्यार्थ्यांना ज्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न 8 लाख इतक्या मर्यादेत आहे अशा विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ
मिळणार असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

या योजनेंतर्गत अभ्यासक्रम व शैक्षणिक साहित्य याकरिता 50 हजार रुपये देण्यात येणार असून विद्यापीठाने
निर्धारित केलेल्या शैक्षणिक शुल्क, परीक्षा शुल्क, नोंदणी फी ची प्रतिपूर्ती आणि वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना
वसतिगृह व भोजन शुल्क रक्कम दिले जाणार आहे. तसेच मराठा समाजातील गुणवंत विद्यार्थीं परदेशातील
नामांकित विद्यापीठामधील उच्च शिक्षणापासून वंचित राहू नये, म्हणून ओबीसी विद्यार्थ्यांना लागू असलेल्या
शिष्यवृत्तीप्रमाणे पदव्युत्तर पदवीसाठी प्रती वर्षी 30 लाख रुपये मर्यादेत आणि पीएचडी साठी 40 लाखाच्या मर्यादेत
परदेशी शिष्यवृत्ती योजना सुरू करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.

Web Title :- Chandrakant Patil | Students from Maratha community will get subsistence allowance like SC, ST, OBC, according to Higher and Technical Education Minister Chandrakant Patil

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | गुंतवणुकीवर जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून 12 लाखांची फसवणुक; सांगलीच्या मिलिंद गाढवे आणि निगडीतील अजय इंगळेवर FIR

Qala Movie | बहुचर्चित काला चित्रपटाची रिलीज डेट जाहिर, ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Balasaheb Thorat | काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत उद्धव ठाकरे सहभागी होणार?, बाळासाहेब थोरात म्हणाले…