Chandrakant Patil | ही कुठली हिंदू संस्कृती?, चंद्रकांत पाटलांच्या आई-वडिलांना शिवी देण्यासंदर्भातील वक्तव्यावरुन नाना पटोलेंचा सवाल

पोलीसनामा ऑनलाइन टीम – राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सुरु असलेल्या आरोप-प्रत्यारोपाच्या फैरीमध्ये खालची पातळी गाठली आहे. त्यात आता भाजप आमदार (BJP MLA) आणि मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केलेल्या एका विधानाची राज्याच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे. यावरुन विरोधी पक्षातील नेत्यांनी चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यावर निशाणा साधला आहे. काँग्रेसचे (Congress) नेते आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी ही कुठली हिंदू संस्कृती (Hindu Culture) आहे? असा सवाल उपस्थित करत पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.

 

काय म्हणाले चंद्रकांत पाटील?
गुरुवारी पुण्याच्या पालकमंत्रीपदी (Pune Guardian Minister) नियुक्ती झाल्यानंतर चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी हातकणंगले मतदार संघातील निवडणूक (Hatkanangale Constituency Election) आणि त्यावेळी झालेल्या आरोप-प्रत्यारोपांविषयी भाष्य केले. हातकणंगल्यात रोज उठून राजू शेट्टी (Raju Shetty) मोदींना शिव्या घालायचे. माझे खूप चांगले मित्र आहेत. म्हटलं तुम्ही चूक करताय. आई-वडीलांना शिव्या द्या चालेल. आईवरुन शिव्या देणं आमची कोल्हापूरची पद्धत आहे. पण मोदी (PM Narendra Modi) आणि शहांना (Amit Shah) शिव्या देणं सहन करु शकत नाही, अंस पाटील म्हणाले होते.

 

काय म्हणाले नाना पटोले?
चंद्रकांत पाटील यांच्या या विधानावरुन नाना पटोले यांनी चंद्रकांत पाटील यांचा चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले, चंद्रकांत पाटील बोलले ही कोणती संस्कृती आहे. हिंदू, शीख, मुस्लिम यांच्यासाठी आई-वडील श्रेष्ठ आहेत. ज्यांनी जन्म दिला त्यांचा अभिमान असला पाहिजे. त्यांच रक्षण करण्याची जबाबदारी मुलांवर असते. स्वार्थासाठी सगळं राजकारण चाललं आहे. हिंदू-हिंदू करत हिंदूंची मते घ्यायची आणि सत्तेसाठी दिल्लीच्या तख्तासमोर शरण जाणारा महाराष्ट्र नाही.

महाविकास आघाडीमध्ये कुठलाही संभ्रम नाही
चिन्हाचा विषय हा निवडणूक आयोगाच्या अखत्यारीत होता. या विषयात सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) आपल्याकडे घेतला,
आमदारांच्या अपात्रतेचा विषय विधानसभा अध्यक्षांच्या (Assembly Speaker) अखत्यारीत होता तोही सुप्रीम कोर्टाने घेतला हे सुप्रीम कोर्टाने आपल्याकडे घेण्याचे कारण काय परंतु न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास आहे.
दुसऱ्याच घर तोडण हा भाजपचा धंदा आहे. भाजपने शिवसेना (Shivsena) फोडण्याचे काम केले आहे.
महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Aghadi) कोणताही संभ्रम नाही,
जी जागा ज्या पक्षाने लढवली ती जागा तोच पक्ष लढवेल.
महाविकास आघाडीमध्ये वंचित आघाडीला आमचा विरोध नाही, फक्त समोरासमोर बसून बोलणी झाली पाहिजे.

 

Web Title :- Chandrakant Patil | Which Hindu culture is this?, Nana Patole’s question on Chandrakant Patel’s statement regarding abusing his parents

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | कारागृहातून बाहेर आला आणि पुन्हा ‘आत’ गेला ! तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी सराईत पुन्हा जेरबंद

Pakistan Vs India | पाकिस्तानविरुद्धचा सामना गमावून देखील भारत अव्वल स्थानी कायम

Pune Crime | ब्रेकअप झाल्यावर तिला धडा शिकवण्यासाठी युट्युबवरून चोरी करायला शिकला; 14 लाखांवर मारला डल्ला