Chandrashekhar Bawankule | शिवसेनेला विधानसभा निवडणुकीत 48 जागा? बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आगामी विधानसभा निवडणुकीत (Assembly Elections-2024) भाजप (BJP) 240 जागा लढणार असून शिंदे गटाकडे (Shinde Group) 50 पेक्षा अधिक जगा लढवण्यासाठी नेते नाही, असे युतीतील जागावाटपाबाबत संयम न ठेवता वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केले. त्यांचे हे वक्तव्य समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर शिंदे गटाला 48 जागा मिळतील, असा अर्थ काढला जात आहे. यानंतर चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी लगेच सारवासारव करत या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

काय म्हणाले बावनकुळे?

मी जे बोललो त्यातला केवळ अर्धाच भाग दाखवण्यात आला आहे. खरं तर शिवसेना (Shivsena) आणि भाजप मिळून विधानसभेच्या 288 आणि लोकसभेच्या (Lok Sabha Elections-2024) 48 जागा लढणार आहे. आम्ही एनडीएतील (NDA) सर्व घटक पक्ष मिळून या जागा लढणार आहोत. विधानसभेची निवडणूक ही देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या समन्वयानं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि गृहमंत्री अमित शाह (Home Minister Amit Shah) यांच्या मार्गदर्शनाखाली लढवली जाईल.

जागा वाटपची चर्चा नाही

राज्यातील विधानसभेच्या 288 जागा जिंकण्याची तयारी आम्ही सुरु केली आहे.
आतापर्यंत राज्यामध्ये युतीला जेवढं बहुमत मिळालं नाही, तेवढं बहुमत आम्ही मिळवणार आहोत.
तशी तयारी आम्ही सुरु केली आहे. त्यामुळे माझ्या बोलण्याचा विपर्यास करण्यात आला.
तेवढीच क्लिप व्हायरल करण्यात आली. अजून कुठलाही जागा वाटपाचा फॉर्म्युला ठारलेला नाही.
याबाब कोणतीही चर्चा सुरु झाली नसल्याचे चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी स्पष्टीकरण दिले.

Advt.

Web Title :- Chandrashekhar Bawankule | chandrasekhar bawankules reaction on the assembly election formula

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Parbhani Crime News | शेतात काम करत असताना वीज कोसळून 2 जणांचा दुर्दैवी मृत्यू

Nagpur Crime News | ओव्हरटेक करण्यावरून झालेल्या वादातून आरोपी कार चालकाकडून महिलेला मारहाण