Chandrashekhar Bawankule | प्रकाश आंबेडकर लहान डोक्याचे, चंद्रशेखर बावनकुळेंचे टीकास्त्र

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी भाजपवर (BJP) तसेच राष्ट्रीय स्वंयसेवक संघावर (RSS) एक वक्तव्य केले. त्याला प्रतिउत्तर देताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यावर टीका केली आहे. त्यावर बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, प्रकाश आंबेडकर हे लहान डोक्याचे आहेत. त्यांच्याविषयी काय बोलावं? असं म्हणत त्यांनी (Chandrashekhar Bawankule) प्रकाश आंबेडकर यांच्यावर टीका केली आहे.
यावेळी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, ‘उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) किंचीत सेना आणि वंचित सेना एकत्र झाली आहे. पण या दोघांचं एकत्र येणं महाविकास आघाडीला (MVA) मान्य नाही. कितीही वंचित आणि किंचीत सेना एक झाली तरीही आम्हाला अडचण नाही. शिंदे-फडणवीस सरकारलाही काही अडचण नाही. महाविकास आघाडीलाही आम्ही टक्कर देऊ शकतो. एवढंच नाही तर प्रकाश आंबेडकर यांनी जे मनुस्मृतीविषयी (Manusmruti) जे वक्तव्य केलं कारण ते इतक्या लहान डोक्याचे आहेत. भाजपा हा जगातला सर्वात मोठा पक्ष आहे. महामानव बाबासाहेब आंबेडकर (Dr.Babasaheb Ambedkar) यांना अभिप्रेत असलेलं शासन माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत. तसचं, भाजपामध्ये सर्वाधिक आदिवासी आणि मागास वर्गांचे कार्यकर्ते आहेत. हे त्यांना कळत नसेल तर काय बोलणार?’ असं बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी यावेळी बोलताना म्हटलं आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी आज बोलताना म्हटलं होतं की, ‘आजच्या घडीला कुठलाही पक्ष कुठल्या पक्षाचा शत्रू नाही.
टोकाचे मतभेद असू शकतात. आमचे आणि आरएसएस, भाजपाचे टोकाचे मतभेद आहेत.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असो किंवा भाजपा असो ते आजही मनुस्मृती मानतात.
आमचा लढा मनुस्मृतीच्या विरोधातला आहे. भाजपा आणि संघाने जर मनुस्मृती सोडली आणि घटनेच्या
चौकटीत राहून काम करणार असतील तर आम्ही त्यांच्यासोबत बसायला तयार आहोत.’
असं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केले.
Web Title :- Chandrashekhar Bawankule | chandrashekhar bawankule criticized prakash ambedkar over his statement about rss and bjp
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update