४ दिवसात ‘लॉन्च’ नाही झालं तर मग चांद्रयान-२ ‘मोहिम’ ३ महिन्यानंतर, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (ISRO) अवकाश मोहिमेतील सर्वात मोठी मोहिम चांद्रयान-२ ही तांत्रिक कारणांनी थांबवली आहे. लॉन्च करण्याआधी ISRO कडून ही मोहिम रद्द करुन पुढे ढकलण्यात आली आहे. लॉन्चिंगच्या ५६.२४ मिनिटे आधी चांद्रयान-२ चे काऊंटडाऊन थांबवण्यात आले. १५ जुलैला रात्री २.५१ मिनिटांनी चांद्रयान अवकाशात झेप घेणार होते.

३ – ४ दिवसात लॉन्चिंग न केल्यास 3 महिने थांबावे लागेल :

इसरोकडून सांगण्यात आले आहे की मोहिमेचे काऊंटडाऊन रोखण्यात आले आहे. याचे कारण अजून स्पष्ट करण्यात आले नसले तरी, लॉन्चिंग व्हेईकलमध्ये लॉन्चिंग दरम्यान योग्य दबाव तयार होत नव्हता. यामुळे लॉन्चिंग रोखण्यात आले. लॉन्चिंग नंतर इसरोचे वैज्ञानिक याची तपासणी करत आहे की लॉन्चिंग करताना तांत्रिक अडचण का आली. इसरोचे वैज्ञानिक या प्रयत्नात आहे की येणाऱ्या ३ – ४ दिवसात चांद्रयानचे लॉन्चिंग करता यावे नाहीतर या मोहिमेसाठी पुढील तीन महिने थांबावे लागेल.

इसरोच्या सुत्रांकडून महिती मिळाली की चांद्रयान किंवा रॉकेटमध्ये काहीही समस्या नाही, समस्या जीएसएलवी-एम के ३ क्रायोजेनिकमध्ये इंजिन आणि चांद्रयानला जोडण्यात आलेल्या लॉन्च व्हेईकल मध्ये आहे.  प्राथमिक माहिती नुसार प्रेशर लीकच्या कमतरतेमुळे ही लॉन्चिंग थांबवण्यात आली. आता रॉकेटचे सर्व भाग वेगवेगळे करुन तपासणी करण्यात येईल. यासाठी आधिक वेळ लागण्याची शकयता आहे.

लॉन्चिंग थांबवल्यानंतर इसरो करणार ही तपासणी

१. रॉकेटमधून इंधन काढून घेण्यात येईल
वैज्ञानिक आता सर्वात आधी जीएसएलव्ही रॉकेटमधून इंधन काढतील. याला डीफ्युलिंग म्हणतात. ही प्रक्रिया अत्यंत कठीण आणि धोकादायक असते. यात बूस्टर्स, पहिली स्टेज, दुसरी स्टेज, आणि क्रायोजेनिक इंजिन यांचा समावेश असतो. यातील इंधन काढून घेण्यात येईल. यातून सर्वात जास्त महत्वपूर्ण क्रायोजेनिक इंजिनमधून काढण्यात येणारे लिक्विड ऑक्सिजन आणि हायड्रोजन असेल. हे माइनस १५६ डिग्रीवर ठेवण्यात येईल.

२. भाग वेगवेगळे करणार
इंधन काढण्यासाठी सर्वात आधी जीएसलव्ही – एमके ३ रॉकेटला चांद्रयान- २ पासून वेगळे करण्यात येईल. या प्रक्रियेला रॉकेट डिस्क्टॅकिंग म्हणतात. जेणे करुन संपुर्ण चांद्रयान मोहिमेची कायद्याने चौकशी करता येईल.

३. विश्लेषण समिती बनवून करणार तपासणी
चंद्रयान – २ मधील तांत्रिक कमतरता शोधण्यासाठी इसरोच्या विविध सेंटर्सचे वैज्ञानिक एक विश्लेषण समिती बनवेल. ही समिती या लॉन्चिंगची तपासणी करेल. जेणे करुन तपासणी करुन सुधारणा करता येईल. यानंतर सर्व भागांची चाचणी करण्यात येईल.

४. पुन्हा तारखेची घोषणा करणार
सर्व आवश्यक चाचण्या घेतल्यावर लॉन्चिंग करण्यासाठी लॉन्चिंग तारिख घोषित करण्यात येईल. त्यानंतर जीएसएलवी एम के ३ रॉकेट आणि चंद्रयान – २ यांची एसेंबलिंग करण्यात येईल. कंप्युटरमध्ये लॉन्चिंग शेड्यूल लावण्यात येईल. २० ते २४ तास आधी हे काऊंटडाऊन सुरु करण्यात येईल. हे सर्व ठीक करुन देखील जर लॉन्चिंग करता आली नाही तर पुन्हा मोहिम थांबवण्यात येईल.

५. ऑक्टोबर मध्ये होऊ शकते लॉन्चिंग
लॉन्च विंडोचा निर्णय इसरोच्या त्रिवेंद्रममधील स्पेस फिजिक्स लॅब घेईल. पुढील लॉन्च विंडो १० ऑक्टोबर ते २६ ऑक्टोबर या दरम्यान होण्याची शक्यता आहे. कारण या दरम्यान पृथ्वीपासून चंद्रातील अंतर ३.६१ लाख किमी असेल. जर १५ जुलैला चांद्रयान – २ ची लॉन्चिंग यशस्वी झाली तर जवळपास ३.८४ लाख किमी प्रवास करावा लागेल. म्हणजे जवळपास २३ हजार किमी जास्त अंतर कापावे लागेल.

 

आरोग्यविषयक वृत्त

उलट्यांचा त्रासाने प्रवास टाळत असाल तर करा ‘हे’ ४ उपाय

लिंबू पाणी पिण्याचे ‘हे’ ७ फायदे

पेनकिलर ऐवजी ‘हे’ घरगुती उपाय करा, तत्काळ ‘रिलीफ’ मिळेल

पोटदुखीसह त्वचा आणि केसांच्या समस्यांवर ‘हे’ गुणकारी औषध, जाणून घ्या

‘ही’ ४ झाडे विविध आजारांवर उपयोगी, जाणून घ्या

‘हा’ योगा केल्याचे ४ फायदे, वेळोवेळी पाणी पिण्याची नाही गरज

‘हे’ उपाय केल्याने चेहरा होईल ‘चमकदार’ ; फेशिअलची गरज नाही

अनेक आजारांवर प्राचीन काळातील ‘हे’ २४ ‘रामबाण’ उपाय, जाणून घ्या

समृद्ध आरोग्यासाठी ‘शीर्षासन’

तळपायांना होतात हे आजार, जाणून घ्या

 

You might also like