‘त्या’ अभियंत्याच्या कुटुंबियांची सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतली भेट

मुंबई : पोलिसनामा ऑनलाइन – आमदार नितेश राणे यांनी चिखलफेक केलेल्या त्या उप अभियंत्याची सार्व. बांध. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुणे येथील त्यांच्या निवासस्थानी जाऊन प्रत्यक्ष भेट घेऊन दिलासा दिला आहे. शेडेकर यांच्यावर गुरुवारी कणकवली येथे आमदार नितेश राणे व त्यांच्या समर्थकांनी चिखलफेक केली होती. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री तथा सार्व. बांध. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उप अभियंत्यांच्या कुटुंबीयांची घेतलेली ही भेट अधिकारी व प्रशासनाचे मनोधैर्य उंचावणारी असल्याचे बोलले जात आहे.

“आमच्या मुलाचा काय दोष साहेब..! आमच्या मुलाच्या प्रामाणिकपणाची हीच शिक्षा आहे का ?” अशा शब्दांत सार्व. बांध. विभागातील अधिकारी प्रकाश शेडेकर यांच्या आईने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमोर आपल्या भावनांना वाट करून दिली. मुंबई – गोवा महामार्गावरील खड्ड्यांवरुन उपअभियंत्यावर चिखलफेक केल्यामुळे आमदार नितेश राणे चांगलेच अडचणीत आले असून, आता महाराष्ट्र शासन मंत्रालय सार्वजनिक बांधकाम विभाग देखील या उप अभियंत्याच्या बाजूने उभे राहिल्याचे पाहायला मिळत आहे. आरोपी आहेत त्यांना शिक्षा होणार आणि सरकार अधिकाऱ्यांच्या पाठीशी आहेत.

शेडेकर यांना पोलिस संरक्षण दिले असून त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना सर्वतोपरी मदत करणार असल्याचे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले. तसेच उप अभियंत्यांची काळजी घेण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्याची कळत आहे. ही घटना माध्यमातून आणि इतर सोशल मीडियातून समोर आल्यानंतर त्या अधिकाऱ्याची बदनामी झाल्यामुळे त्या अधिकाऱ्यावर नक्कीच मानसिक ताण निर्माण झाला असेल, त्यामुळे सध्या त्या अधिकाऱ्याच्या पाठिशी उभे राहून त्यांना धीर द्या, असे आदेशच चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिले आहेत. तसेच पाटील यांनी या घटनेनंतर स्वतः प्रत्यक्ष भेट घेतली. तसेच यावेळी त्यांच्या कुटुंबियांना कोणतीही काळजी करू नका, मी तुमच्या पाठीशी आहे, असा दिलासा देखील दिला. असल्याची सूत्रांकडून कळत आहे.

 काय आहे प्रकरण –

गुरुवारी आमदार नितेश राणे यांनी महामार्गाची पाहणी करताना रस्ते अभियंता प्रकाश शेडेकर यांना चिखलफेक केली. एवढंच नाही तर राणे यांनी अभियंत्याला गडनदी पुलाला बांधून ठेवत, महामार्ग सेवा रोड तुझा बाप बांधणार का ?, असा सवाल केला होता. त्यानंतर हे वातावरण अधिकच चिघळले असून, या प्रकरणी नितेश राणे यांना अटक देखील करण्यात आली आहे.

सावधान ! ‘कॅन्सर’ला धुम्रपानापेक्षा लठ्ठपणा अधिक कारणीभूत

‘हे’ आहेत दही खाण्याचे फायदे

‘किडनी स्टोन’ वर घरगुती रामबाण उपाय

Video : अभिनेत्री सनी लियोनीच्या सौंदर्याचं ‘राज’

‘या’ पेयाचे नियमित सेवन करा आणि उत्तम आरोग्य मिळवा

सेल्युलाइटवर नियंत्रण मिळवायचे असेल तर करा ‘हे’ उपाय

तुमची त्वचा शुष्क आहे का? मग हे उपाय करून पाहा

फरार असलेले दिलीप तिडके अखेर लाचलुचपत अधिकाऱ्याच्या जाळ्यात

खुशखबर ! निवृत्तीचे वय वाढविण्याचा सरकारचा विचार