1 फेब्रुवारीपासुन बदलणार घरगुती गॅस, ATM, WhatsApp सह ‘हे’ 6 नियम, तुमच्या बजेटवर थेट परिणाम, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – या वर्षात काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत जे 1 फेब्रुवारीपासून लागू होतील. यात स्वयंपाकाच्या गॅसचे दर, बंद होणाऱ्या एलआयसीच्या 23 योजना, बँक कर्मचाऱ्यांचा संप, व्हॉट्सअ‍ॅप, एटीएम कार्डसंंबंधित माहिती याचा समावेश आहे. हे असे नियम आहेत ज्याने तुम्हाला दिलासा देखील मिळेल तर काही निर्णय लक्षात न घेतल्यास आर्थिक नुकसानही होऊ शकेल.

1) 75 लाख स्मार्टफोनवर व्हॉट्सअ‍ॅप बंद –
1 फेब्रुवारी 2020 पासून लाखो स्मार्टफोनवर व्हॉट्सअ‍ॅप सपोर्ट करणार नाही. जुने ऑपरेटिंग सिस्टम असलेल्या फोनचा यात समावेश आहे. त्यामुळे यूजर्सला 31 जानेवारीपर्यंत नवे फोन खरेदी करावा लागतील. 2.3.7 अ‍ॅण्ड्राइड फोन तर आयओएस 7 असलेल्या आयफोनवर व्हॉट्सअ‍ॅप सपोर्ट करणार नाही.

कंपनीने सांगितले की याचा परिणाम जास्त युजर्सवर होणार नाही. कारण अनेक नव्या यूजर्सकडे नवे स्मार्टफोन आहेत. अ‍ॅण्ड्राइडच्या किटकॅट व्हर्जन 4.0.3 वर्जन किंवा त्यापेक्षा पुढच्या व्हर्जनमध्ये व्हॉट्सअ‍ॅपचा सपोर्ट मिळेल. परंतु त्यापेक्षा जुन्या स्मार्टफोनमध्ये व्हॉट्सअ‍ॅप चालणार नाही. नोकिया सॅबियन एस 60 मध्ये 30 जून 2017, ब्लॅकबेरी ओएस आणि ब्लॅकबेरी 10 मध्ये 31 डिसेंबर 2017, नोकिया एस 40 मध्ये 31 डिसेंबर 2018 नंतर व्हॉट्सअ‍ॅप सपोर्ट बंद केला आहे.

2) घरगुती गॅस –
1 फेब्रुवारीपासून घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात बदल होतील. आंतरराष्ट्रीय स्तरावर गॅसच्या किंमतीत बदल झाल्याने त्याचा परिणाम स्थानिक बाजारावर झाला. दर महिन्याच्या पहिल्या तारखेला घरगुती गॅस सिलेंडर आणि विमान इंधनाचे दर बदलतात.

जानेवारीमध्ये सरकारने गॅसचे दर 19 रुपयांनी वाढले. ही वाढ सबसिडी असलेल्या सिलेंडरच्या दरात झाली होती. याशिवाय विमान इंधनाचे दर 2.6 टक्क्यांनी वाढले. आंतरराष्ट्रीय स्तरावर तेजी आल्याने हे दर वाढले.

गैर सबसिडी असलेल्या 14.2 किलोचा सिलेंडर, जो 695 रुपयांना मिळतो. तो जानेवारीमध्ये 714 रुपयांना मिळेल. ही भाववाढ जानेवारी 2020 पासून लागू झाली. सप्टेंबर 2019 नंतर गॅसच्या दरात पाचव्यांदा वाढ होईल. पाच महिन्यात याचे दार 139.50 रुपयांपर्यंत वाढले.

3) बंद होणार एलआयसीच्या 23 योजना –
एलआयसी 31 जानेवारीपासून 23 प्लॅन बंद करणार आहे. नोव्हेंबर 2019 मध्ये भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने जीवन वीमा कंपन्या त्या लाइफ इंश्योरेंस आणि राइडर्सला बंद करण्यास सांगितले होते, ज्याच्या नव्या प्रोजेक्ट गाइडलाइन्सच्या अनुरुप नाही. अंतिम तारीख 30 नोव्हेंबर 2019 केली होती, जी 31 जानेवारीपर्यंत वाढण्यात आली होती. तर सध्याच्या जीवन विमा पॉलिसीमध्ये बदल किंवा त्यासाठी पुन्हा परवानगी दिल्यास शेवटची तारीख 29 फेब्रुवारी 2020 आहे.

एलआयसीच्या 23 लाइफ इंश्योरेंस प्रोडक्ट्स आणि राइडर्स बंद होणार आहेत, त्यात खालील योजनांचा समावेश आहे –

– एलआयसी भाग्यलक्ष्मी प्लान
– एलआयसी आधार स्तंभ
– एलआयसी आधार शिला
– एलआयसी जीवन उमंग
– एलआयसी जीवन शिरोमणी
– एलआयसी बीमा श्री
– एलआयसी माइक्रो बचत
– एलआयसी न्यू एंडोमेंट प्लस (यूलिप)
– एलआयसी प्रीमियम वेवर राइडर (राइडर)
– एलआयसी न्यू ग्रुप सुपरएन्युएशन कॅश एक्युमुलेशन प्लॅन (ग्रुप प्लॅन)
– एलआयसी न्यू ग्रुप ग्रेच्युटी कॅश एक्युमुलेशन प्लॅन (ग्रुप प्लॅन)
– एलआयसी न्यू ग्रुप लीव इनकॅशमेंट प्लॅन (ग्रुप प्लॅन)
– एलआयसी सिंगल प्रीमियम एंडोमेंट प्लॅन
– एलआयसी न्यू एंडोमेंट प्लॅन
– एलआयसी न्यू मनी बॅक – 20 साल
– एलआयसी न्यू जीवन आनंद
– एलआयसी अनमोल जीवन-II
– एलआयसी लिमिटेड प्रीमियम एंडोमेंट प्लॅन
– एलआयसी न्यू चिल्ड्रन्स मनी बॅक प्लॅन
– एलआयसी जीवन लक्ष्य
– एलआयसी जीवन तरुण
– एलआयसी जीवन लाभ प्लॅन
– एलआयसी न्यू जीवन मंगल प्लॅन

4) वापरता येणार नाही पोस्ट ऑफिसचे एटीएम कार्ड –
डाक विभागाने आपल्या बचत खातेदाराना आपला मोबाइल नंबर अपडेट करण्यास आणि 31 जानेवारीपर्यंत मॅग्निटिक एटीएम कार्डला नव्या ईव्हीएम चिप आधारित कार्ड मध्ये बदलण्यास सांगितले आहे. हे कार्ड जास्त सुरक्षित आहे. कार्ड न केल्यास त्यांचा कार्ड ब्लॉक होईल. पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन ग्राहक आपले कार्ड बदलू शकता आणि मोबाइल नंबर अपडेट करु शकतात. देशभरात पोस्ट ऑफिसची बचत खात्याची योजना उपलब्ध आहे. यावर 4 टक्के व्याज मिळते आणि किमान 500 रुपये रक्कमेवर खाते सुरु करता येते. या खात्यासोबत चेक आणि एटीएम कार्डची सुविधा मिळेल.

5) बँकेचा 3 दिवस संप –
जर तुमचे बँकसंबंधित काही काम असेल तर ते 31 जानेवारीपूर्वी उरकून घ्या, कारण दोन दिवस बँका बंद असणार आहेत. शुक्रवार, शनिवार बँक कर्मचारी संपावर जातील, त्यापाठोपाठ रविवार असल्याने बँका सलग 3 दिवस बंद राहतील. SBI कडून या संबंधित माहिती देण्यात आली. 31 जानेवारीपासून सुरु होणाऱ्या या दोन दिवसीय राष्ट्रव्यापी संपाचे बँकेच्या कामकाजावर परिणाम होईल. बँक कर्मचारी संघटनांना वेतन सुधारणेसंबंधित उपाययोजना न केल्याने 31 जानेवारी ते 1 फेब्रुवारी संपाची घोषणा केली आहे. बँक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या संपामुळे बँकेच्या कामकाजावर याचा परिणाम होईल. त्यामुळे ग्राहकांनी बँकसंबंधित कामे उरकून घ्यावीत, ज्याने काही आर्थिक अडचणी येणार नाहीत.

6) व्याज दर स्थिर ठेवू शकते आरबीआय –
आरबीआयची समिक्षा बैठक 6 फेब्रुवारीला होईल. रेपो दर बदल होणार नाहीत अशी शक्यता आहे. डिसेंबरमध्ये महागाई 7.35 टक्के होती तर जानेवारीमध्ये 8 टक्के स्तरापेक्षा जास्त आहे. एसबीआयच्या इकोरॅपनुसार आरबीआयने डिसेंबरमध्ये रेपो दरात बदल केला नव्हता. तर ऑक्टोबरमध्ये 4.62 टक्के होते. जानेवारीसमध्ये हे प्रमाण 8 टक्क्यावर जाण्याचे अनुमान आहे. त्यामुळे पुढील व्याजदर स्थिर राहू शकतो.