पालखी मुक्कामादरम्यान पिंपरी-चिंचवडमधील वाहतूकीत बदल

पिंपरी  : पोलीसनामा ऑनलाईन

संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज पालखी सोहळा गुरुवारी (दि.५) देहूगावातून पंढरपूरकडे प्रस्थान करत आहे. शुक्रवारी (दि.६) रोजी सायंकाळी पालखी सोहळा पिंपरी-चिंचवड शहरात दाखल होणार आहे. या दरम्यान पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूकीत बदल करण्यात आले आहेत. तसेच पालखी सोहळा पुण्याकडे प्रस्थान केल्यानंतर देखील वाहतूकीत बदल करण्यात आला आहे. वाहतूकीतील बदल खालील प्रमाणे असणार आहेत.

शुक्रवारी (दि.६) देहूफाटा ते भक्ती-शक्ती चौकादरम्यानची वाहतूक बंद करण्यात आली आहे. हा बदल पालखी मुक्कामाच्या ठिकाणी पोहचेपर्यंत असणार आहे. या वेळेत पुण्याकडे येणाऱ्या जड वाहनांकरीता देहू फाटा ते कात्रज बायपास आणि मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांकरीता खंडोबाचा माळ (आकुर्डी) उजवीकडे वळून पाण्याची टाकी थरमॅक्स चौक ते देहूरोड या मार्गाचा वापर करावा लागणार आहे.

भक्ती शक्ती चौक ते देहू फाटा रस्ता बंद
१) पुण्याकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांकरीता देहू फाटा ते कात्रज बायपास मार्गे काळा खडक-डांगे चौक किंवा वाकड चौक चिंचवड मार्गे इच्छीत स्थळी

२) प्राधीकरणाकडे जाणाऱ्या वाहनांकरीता – थरमॅक्स चौक – खंडोबाचा माळ – चापेकर चौक – चिंचवडे फार्म – बिजलीनगर मार्गे प्राधिकरण किंवा टेल्को रोड – थरमॅक्स चौक – दुर्गादेवी चौक – चिकन चौक – भक्ती-शक्ती चौक मार्गे किंवा अंतर्गत रस्त्यांचा वापर करावा.

दुर्गादेवी चौक ते टिळक चौक रस्ता बंद

पर्यायी मार्ग – चिकन चौक किंवा थरमॅक्स चौक – खंडोबाचा माळ रस्त्याचा वापर करावा.

म्हाळसाकांत चौक ते टिळक चौक रस्ता बंद
पर्यायी मार्ग – म्हाळसाकांत चौक – खंडोबाचा माळ – संभाजी चौक – बिजलीनगर – चिंचवडे फार्म – रावेत

जुन्या पुणे-मुंबई मार्गावरील निगडी जकात नाका ते खंडोबाचा माळ दरम्यान ग्रेड सेपरेटर मधील दोन्ही बाजु व पुर्वेकडी/ पुण्याकडे येणारा सर्व्हिस रस्ता दुपारी दोन ते सहा दरम्यान पुर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे वाहनचालकांनी खंडोबा माळकडून प्राधिकरणाकडे जाणाऱ्या वाहनांनी एस.के.एफ.कंपनी रोडवरुन चापेकर चौक-बिजलीनगर येथून प्राधीकरणाकडे जावे. प्राधीकरणातून पुण्याकडे येणाऱ्या वाहनांनी बिजलीनगर-चापेकर चौक मार्गे महावीर चौकातून पुणे- मुंबई मार्गावर जावे.

पालखी प्रस्थान आणि आगमन मार्गावरील वाहतूक मार्गात बदल करण्यात आले असून, पालखी पुढे जाऊन मागील रस्ता जस-जसा वाहतूकीस योग्य होईल त्याप्रमाणे खुला करण्यात येईल. तसेच पालीखी पुढे जात असताना संबंधीत मार्गावरील वाहतूक बंद अथवा पर्य़ायी मार्गाने वळवण्यात येणार असल्याचे पुणे वाहतूक शाखेचे पोलीस उप आयुक्त अशोक मोराळे यांनी कळवले आहे.

पालखी सोहळा कालावधीत ठरावीक मार्गावरील वाहतूकीत बदल