न्यायालयातच न्यायाधीशांना साप चावल्याने खळबळ

पनवेल : पोलीसनामा ऑनलाईन

नेहमीप्रमाणे न्यायालयाच्या दालनात कामकाज सुरु असताना अचानक न्यायाधीशांना साप चावला. याचे वृत्त काही क्षणात न्यायालयात पसरल्याने एकच खळबळ उडाली. हा प्रकार आज (मंगळवारी) सकाळी अकराच्या सुमरात पनवेल सत्र न्यायालयात घडला. घटनेची माहिती कळताच सर्पमित्राला बोलविण्यात आले. त्यानंतर सर्पमित्र अॅड. दीपक ठाकूर यांनी साप पकडला.
[amazon_link asins=’B0073C7IIK,B01N4J3WAE’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’7b3512f0-b02e-11e8-a939-fd64289c2116′]

पनवेल सत्र न्यायालयाचे न्यायाधीश सी.पी.काशीद हे आज सकाळी अकरा वाजताच्या दरम्यान आपल्या दालनात आले. दालनात आल्यानंतर कामकाज सुरु झाल्यानंतर न्यायाधीश सी.पी. काशीद यांच्या हाताला सापाने चावा घेतला. त्यानंतर, न्यायालय आवारात सापाच्या नावाने गोंधळ सुरु झाला. या घटनेची माहिती, वकिल आर.के.पाटील यांना मिळताच त्यांनी सर्प मित्र वकिल दीपक ठाकूर यांना बोलवले. अॅड. दिपक ठाकूर यांनी साप ताब्यात घेतला. तसेच हा साप बिनविषारी असल्याचेही ठाकूर यांनी सांगितले. त्यामुळे न्यायधीशांसह न्यायालयातील वकिलांचाही जीव भांड्यात पडला.

न्यायालयात हा प्रकार घडल्यामुळे न्यायालयात कामानिमीत्त आलेल्यांची देखील पळापळ झाली. न्यायाधीशांनाच साप चावल्याची चर्चा सध्या न्यायालयात सुरु आहे.

मराठी बातम्या तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा policenama App …आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट

पुणे : ९६ लाख लुटीच्या प्रकरणात एपीआयसह पोलिसाला ३ वर्षाची शिक्षा