Photos : अभिनेत्री चारू असोपानं शेअर केले ‘हल्दी सेरेमनी’चे एकदम ‘भारी’ फोटो

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – न्यूली मॅरीड कपल चारू असोपा आणि राजीव सेन यांनी साखरपुड्याचे अनसीन फोटो शेअर केल्यानंतर आता आपल्या हळदी समारंभाचे फोटो शेअर केले आहेत. फंक्शनमधील सर्व फोटोंमध्ये चारू पिवळ्या रंगात रंगलेली दिसत आहे. हळदीच्या फोटोंमध्ये चारूने पिवळा लेहंगा-चोळी घातली आहे ज्यात ती खूपच सुंदर दिसत आहे.

लेहंगा आणि चोळीसोबतच तिने फुलांची ज्वेलरी घातली आहे. चारूच्या ज्वेलरीत माथ्यावरील टीका, हातातील फूल, बांगड्या आणि इयररिंग्स आहेत. एका अप्सरेप्रमाणेच ती दिसत आहे. चारूने आपला लुक कंप्लीट करण्यासाठी साजेसी हेअरस्टाईलही केली आहे.

काही फोटोंमध्ये सुष्मिता सेनही राजीवला हळद लावताना दिसत आहे. ७ जून रोजी सुष्मिता सेनचा भाऊ राजीव सेनने टीव्ही अ‍ॅक्ट्रेस चारू असोपासोबत लग्न केलं. दोघांनीही कोर्ट मॅरेज केलं. चारूने या वर्षी जानेवारी मध्ये आपल्या नात्याचा खुलासा केला होता.

कोर्ट मॅरेजनंतर राजीव आणि चारुने १६ जून रोजी पारंपरिक रितीरीवाजांनुसार गोव्यात ७ फेरे घेतले. लग्नाचे विधी राजस्थानी आणि बंगाली रिती रिवाजांनी पार पडले. गोव्यात ३ दिवस झालेल्या ग्रँड सेरेमनीमध्ये साखरपुडा, मेहंदी आणि संगीत असे कार्यक्रम पार पडले.

https://www.instagram.com/p/BzyGiA4pndp/

२८ वर्षीय चारू टीव्ही अ‍ॅक्ट्रेस आहे. चारू ये रिश्ता क्या कहलाता है, मेरे अंगने में, संगिनीमध्ये दिसली आहे. ६ महिने राजीव आणि चारू एकमेकांना डेट करत होते. चारूने मुलाखतीत याबाबत खुलासा केला होता. लाईमलाईटपासून दूर असणारा राजीव ज्वेलरी बिजनेसमन आहे. दुबईसहित देशातील अनेक भागात त्याचा करोडोंचा कारभार आहे. राजीव दुबईतच असतो. तो अधुन मधून मुंबईत येत असतो.

https://www.instagram.com/p/Bzm83H7pmY-/

image.png

image.png

आरोग्यविषयक वृत्त –

अंगाला खाज येत असेल तर करा ‘हे’ ५ घरगुती उपाय

सूर्यफुलाच्या बियांपासून ‘हे’ फायदे तर भोपळ्याच्या बिया ‘या’ ४ गोष्टींसाठी उपयुक्‍त, जाणून घ्या

स्त्रीयांप्रमाणेच पुरुषांनाही येतो ‘मेनोपॉज’, तुम्हाला माहित आहे का ?

स्त्रीयांमधील ‘ही’ लक्षणे देतात त्या ‘प्रेग्नेंट’ असल्याचे संकेत

चिकन खाल्यामुळं ‘हे’ आजार ‘कंट्रोल’मध्ये राहतात, जाणून घ्या

सतत सर्दी होणं म्हणजे ‘या’ आजाराचा धोका, वेळीच ओळखा अन् अशी काळजी घ्या

केसांना कलरिंग करताना ‘या’ ४ गोष्टींची जरूर काळजी घ्या

सफरचंद आरोग्यासाठी फायदेशीर, ‘हे’ 7 महत्वाचे फायदे होतात, जाणून घ्या

जांभळातील पोषक तत्वे शरीराच्या ‘या’ 3 भागांना ठेवातात निरोगी, जाणून घ्या सर्वकाही

पाय थंड पडणे, सूज येणे ही गंभीर समस्या, वेळीच ‘हे’ उपचार करा