कामाची गोष्ट ! तुमच्या परिसरात Vaccine उपलब्ध आहे अथवा नाही ‘हे’ आता Whatsapp वर कळेल; फक्त पिनकोड टाकून, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना संकटात लसीकरण हे खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे प्रत्येकाने लस घ्यावी असे आवाहन सरकारकडून करण्यात येत आहे. मात्र, लसीचा पुरवठा सुरळीत होत नसल्याने काही ठिकाणी लसीकरण केंद्र बंद ठेवावी लागत आहे. लसीकरण अधिक वेगाने आणि गुंतागुंतीशिवाय गर्दी टाळून होण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहे. याचाच एक भाग म्हणून आता केंद्रीय आरोग्य विभागाकडून व्हॉट्सॲप मोबाइल क्रमांक जाहीर करण्यात आला आहे. याद्वारे तुम्हाला तुमच्या भागात लस उपलब्ध आहे किंवा नाही हे समजू शकणार आहे.

कशी मिळेल माहिती

आरोग्य मंत्रालयाकडून 9013151515 हा क्रमांक उपलब्ध करुन दिला आहे. घर बसल्या आपण या नंबरवरुन कोरोना लसीची माहिती घेऊ शकतो. व्हॉट्सॲपमध्ये या नंबरवर आपला पिन कोड टाकून फक्त सेंड करा. त्यानंतर या परिसरात लसीकरणासंदर्भात काय स्थिती आहे, याची संपूर्ण माहिती तुमच्या मोबाईलवर येईल.

कोरोना लसीकरणाची माहिती घेण्यासाठी तुम्हला बाहेर जाण्याची आवश्यकता नाही. लस उपलब्ध आहे किंवा नाही यासाठी परिसरात कुणालाही विचारण्याची गरज नाही. केवळ दिलेल्या नंबरवर आपल्या भागाचा पिन कोट पाठवून आपण लसीची खात्रीलायक माहिती जाणून घेऊ शकता. लसीच्या नोंदणीनंतर लसीकरणासाठी तुमचा नंबर आल्यानंतर त्याचे अपडेट देखील या नंबरवर समजू शकणार आहे. गर्दी आणि गोंधळाशिवाय लसीकरण होण्यासाठी ही व्यवस्था तयार करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.