आता आधार अपडेटसाठी भरावे लागणार शुल्क ; ‘कोणत्या’ बदलाला ‘किती’ खर्च जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आपण नेहमीच आधार कार्डचा वापर करुन विविध सरकारी योजनांचा लाभ घेतो. सिस्टममध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आधार कार्ड सर्व योजनांना जोडण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. योजनेच्या लाभ दुसऱ्याला मिळून नये यासाठी सरकार जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. केंद्र सरकार यासाठी देखील प्रयत्न करत आहे की, आधार कार्ड मध्ये कोणत्याही प्रकारची चूक असेल तर ती आधारधारकांना दुरुस्त करता यावी.

आता आधार कार्डमध्ये अपडेट करण्यासाठी तुम्हाला काही शुल्क भरावे लागणार आहे. UIDAI ने हे शुल्क लावले आहे. आतापर्यंत अपडेट करायचे असल्यास ते मोफत करण्यात येत असे. परंतू UIDAI च्या मते, आधार रजिस्ट्रेशन आणि बायोमेट्रीक अपडेट अजून देखील मोफत आहे.

५० रुपये शुल्क

UIDAI च्या मते आता तुम्हाला अपडेट करण्यासाठी तुम्हाला शुल्क द्यावे लागेल. आधार कार्डमध्ये नाव, पत्ता, मोबाइल नंबर, ई मेल आणि बायोमेट्रीक यासाठी आता आधारकार्ड धारकांना ५० रुपये शुल्क द्यावे लागेल. यावर UIDAI वेगळा जीएसटी देखील आकारणार आहे. याशिवाय तुम्ही eKYC च्या माध्यमातून आधार सर्च, फाइंड आधार याआधारे आधार कार्ड कलर प्रिंटसाठी तुम्हाला वेगळे शुल्क द्यावे लागेल. यासाठीचे शुल्क ३० रुपये असणार आहे. तसेच त्यावर वेगळे शुल्क म्हणून जीएसटी देखील लावण्यात येईल.

या सुधारणांसाठी लागेल एवढा खर्च

१. डेमोग्राफिक अपडेट – ५० रुपये आणि जीएसटी

२. बायोमेट्रीक अपडेट – ५० रुपये आणि जीएसटी

३. आधार प्रिंट – ३० रुपये आणि जीएसटी

आरोग्यविषयक वृत्त –