PF खातेधरकांसाठी खुशखबर! येणार आहेत व्याजाचे पैसे, घरबसल्या ‘या’ 4 पद्धतीने चेक करा बॅलन्स

नवी दिल्ली : वृत्त संस्था – provident fund pf | नोकरी करणारे नेहमी आपल्या पीएफच्या पैशांची माहिती घेण्यासाठी उत्सुक असता. आता हे अतिशय सोपे झाले आहे. आतापर्यंत ऑनलाइन बॅलन्स चेक करणे तसेच पासबुक डाऊनलोड करण्याची सुविधा होती, परंतु ईपीएफओ ती आणखी चांगली करण्यासाठी पावले उचलत आहे. यासाठी आता केवळ एका एसएमएसने आपल्या खात्याचा बॅलन्स समजू शकतो. मात्र, या सुविधेचा फायदा घेण्यासाठी कर्मचार्‍याला आपला युनिव्हर्सल अकाऊंट नंबर (यूएएन) माहित असावा. आपल्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवरून एसएमएस पाठवावा लागेल. 4 अशा पद्धतींबाबत जाणून घेवूयात ज्यांच्याद्वारे तुम्ही पीएफ खात्याचा बॅलन्स चेक करू शकता…

1. एसएमएसच्या द्वारे
तुम्ही एसएमएसने सुद्धा आपला पीएफ अकाऊंटचा बॅलन्स सहज जाणून घेवू शकता. यासाठी तुम्हाला तुमचा युएएन माहित असायला हवा. सोबतच तो अ‍ॅक्टिव्ह असावा. एसएमएस सर्वप्रथम EPFOHO UAN HIN टाइप करून 7738299899 वर पाठवावा लागेल. ज्यानंतर तुम्हाला हिंदीमध्ये मॅसेज येईल. ज्यामध्ये तुमच्या पीएफ अकाऊंटमध्ये जमा रक्कमेची पूर्ण माहिती असेल.

2. वेबसाइटद्वारे
तुम्ही ईपीएफओ वेबसाइटवर जाऊन सुद्धा बॅलन्स चेक करू शकता. यासाठी ईपीएफओ पासबुक पोर्टलवर जा. यूएएन आणि पासबुकने लॉगइन करा. यानंतर डाऊनलोड व्ह्यू पासबुकच्या ऑपशनवर क्लिक करा.

3. उमंग अ‍ॅपद्वारे
प्ले स्टोर वरून उमंग अ‍ॅप डाऊनलोड करा.
या अ‍ॅपवर अनेक सरकारी सेवा उपलब्ध आहेत.
यामध्ये ईपीएफओ ऑपशन निवडल्यानंतर एम्प्लॉई सेंट्रीक सर्व्हिस निवडा.
आता युएएन नंबर टाका. यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर एक ओटीपी प्राप्त होईल.
तुम्ही व्ह्यू पासबूक अंतर्गत ईपीएफ बॅलन्स चेक करू शकता.

4. मिस्ड कॉलसाठी या नंबरवर करा कॉल
तुम्ही तुमच्या पीएफ अकाऊंटचा बॅलन्स एका मिस्ड कॉलने जाणून घेऊ शकता. यासाठी आपल्या अकाऊंटमध्ये रजिस्टर्ड मोबाइल नंबरवरून 011-22901406 वर एक मिस्ड कॉल द्यावा लागेल. ज्यानंतर तुम्हाला ईपीएफओकडून एक एसएमएस येईल. ज्यामध्ये तुम्हाला आपल्या पीएफ अकाऊंटमध्ये जमा रक्कमेची संपूर्ण माहिती मिळेल.

हे देखील वाचा

12 जून राशीफळ : ‘या’ 6 राशींना होणार फायदा, नोकरी-व्यापार आणि आर्थिक क्षेत्रात मिळेल यश, इतरांसाठी असा आहे शनिवार

फेसबुकवर महिन्याभरापूर्वीच ओळख झालेल्या मित्राने आयटी इंजिनिअर महिलेला 44 लाख रुपयांना फसवलं; कोरोना व इतर भूलथापा मारल्या

Adar Poonawalla Security | सुरक्षेची मागणी करताच सुरक्षा पुरवणार, राज्य सरकारची न्यायालयात ग्वाही

Latur News | पावसाळा सुरू झाल्यानंतरही अहमदपूर तालुका तहानलेलाच, 44 गावातील नागरिकांची पाण्यासाठी भटकंती

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा”

Web Title : check your provident fund pf balance 4 ways through sms missed call samp