Chhagan Bhujbal | मुंबई-नाशिक महामार्गाची दुरावस्था, 31 ऑक्टोबरपर्यंत दुरुस्ती झाली नाही, तर टोल नाके बंद करू, छगन भुजबळांचा इशारा

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) नेते आणि आमदार छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) मुंबई-नाशिक महामार्गाची (Mumbai-Nashik Highway) पाहणी केली. यावेळी त्यांना रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट असल्याचे निदर्शनास आले आणि त्यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. 31 तारखेपर्यंत महामार्गाचे काम झाले नाही तर टोल बंद (Toll Plaza Closed) करुन रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी दिला.

छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) नाशिकवरुन मुंबईला परतत असताना त्यांनी घोटी ते बोरटेंभा दरम्यान पाहणी केली. यावेळी त्यांना घाटाची आणि रस्त्यांची दुरावस्था निदर्शनास आली.
त्यामुळे त्यांनी महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना घेऊन पाहणी केली.
यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांची चांगली कान उघाडणी करत, त्वरीत रस्त्यांची सुधारणा करण्यात यावी,
यासाठी सूचना दिल्या. भुजबळ यांनी स्वत: अधिकाऱ्यांना खड्डे दाखवत धारेवर धरले.
मुंबई-नाशिक महामार्गाची 31 ऑक्टोबरपर्यंत दुरुस्ती करा, अशी सूचना भुजबळांनी अधिकाऱ्यांना दिली.
जर ऑक्टोबरच्या अखेरपर्यंत रस्त्यांची दुरुस्ती झाली नाही, तर आम्ही नाशिक मुंबई महामार्गावरील सर्व टोल बंद करु, असा इशारा देखील भुजबळांनी यावेळी दिला.

मुंबई-नाशिक महामार्गाची अक्षरश: चाळण झाली आहे. नाशिक ते मुंबई प्रवास करणाऱ्या आणि कामासाठी जाणाऱ्या
लोकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या मार्गावर अनेक अपघात (Accident) देखील झाले आहेत.
या अपघातात आतापर्यंत अनेकांचा जीव गेला आहे. त्यामुळे आज स्वत: पुढाकार घेत छगन भुजबळ यांनी
अधिकाऱ्यांना घेऊन रस्त्यांची पाहणी केली आणि सर्वांनाच चांगला दम भरला.
त्यांनी दुरुस्तीला ऑक्टोबर अखेरची मुदत दिली असून, त्यानंतर टोलनाके बंद करण्याचा आणि आंदोलनाचा इशारा
अधिकाऱ्यांना दिला आहे.

Web Title :- Chhagan Bhujbal | Bad condition of Mumbai-Nashik highway, if not repaired by October 31, we will close toll booths, warns Chhagan Bhujbal

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा