Chhagan Bhujbal | उद्धव ठाकरेंनी राजीनामा देण्याची घाई केली नसती तर…, छगन भुजबळांचे मोठे विधान (व्हिडिओ)

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर (Shinde-Fadnavis Government) पुन्हा निशाणा साधला आहे. तसेच उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) राजीनाम्यावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा (Resignation) देण्याची घाई केली नसती तर आज काही प्रश्न हे वेगळ्या मार्गावर गेले असते. मात्र जर तरला अर्थ नसतो. सहानुभूमती उद्धव ठाकरे यांच्या मागे आहे. त्यांना मतदारांचा पाठिंबा मिळत असल्याचे छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी सांगितले. ते नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.

 

सध्या न्यायालयात सुरु असलेल्या सुनावणीवर (Maharashtra Political Crisis) विचारले असता, छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) म्हणाले, वकील वेगवेगळे मुद्दे निर्माण करत आहेत. सुप्रीम कोर्ट (Supreme Court) काय निर्णय घेते हे पाहणे महत्त्वाचं आहे. एक प्रकारचा कानुनी लोचा निर्माण झाला आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत निर्णय अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले.

 

 

एसटी कर्मचाऱ्यांच्या (ST Employees) रखडलेल्या वेतनावरुन भुजबळ यांनी शिंदे सरकारला टोला लगावला. एसटीचे विलिनीकरण व्हावे अशी कर्मचाऱ्यांची मागणी आहे. पवार साहेबांच्या घरावर देखील हल्ला केला होता. त्यामुळे आता एसटीचे विलिनीकरण करुन घ्यावे. सदावर्ते यांनी सरकारच्या घरावर मोर्चे न्यावेत असेही भुजबळ यांनी म्हटलं.

 

आसामचे मुख्यमंत्री सरमा यांनी भीमाशंकर ज्योतिर्लिंग (Bhima Shankar Jyotirlinga) हे महाराष्ट्रात नसून आसाम मध्ये असल्याचे म्हटले होते.
यावरुन भुजबळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यावर निशाणा साधला.
घेऊन जा सगळं आता तेवढंच राहिलं आहे.
आपले लोक तिकडं गेले होते त्यांनी सांगितलं की काय असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला.

 

Web Title : – Chhagan Bhujbal | chhagan bhujbal nashik press conference chhagan bhujbals reaction on uddhav thackerays resignation

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime News | बलात्कारातून झालेल्या मुलाच्या संगोपनासाठी दिलेले चेक झाले बाऊन्स; 65 वर्षीय माजी मंत्र्यासह चौघांविरूध्द गुन्हा

Madhuri Pawar | रानबाजारनंतर माधुरी दिसणार ‘या’ ऐतिहासिक चित्रपटात; साकारणार भावूक करणारी भूमिका

Parbhani Crime News | आईला भेटायला जात असताना तरुणाचा अपघाती मृत्यू; परभणीमधील घटना