Chhagan Bhujbal | छगन भुजबळ यांना डावलल्याने महायुतीचा निषेध ! पुढील दोन दिवसांत निर्णय जाहीर करू – समता परिषदेचा महायुतीला इशारा (Video)

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Chhagan Bhujbal | पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी नाशिक मतदारसंघातून (Nashik Lok Sabha) ओबीसी नेते (OBC Leader) छगन भुजबळ यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतरही राज्यात महायुतीने (Mahayuti) उमेदवारी निश्‍चितीबाबत विलंब लावला. भुजबळ यांना डावलण्यासाठीच जाणीवपुर्वक विलंब लावल्याबद्दल अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद महायुतीचा निषेध करत आहे. यामागे नेमके कोण व्हीलन आहे, हे लवकरच समोर येईल. लोकसभेमध्ये ओबीसी उमेदवारांच्या पाठीशी सर्व ओबीसी संघटना राहाणार असून येत्या दोन दिवसांत निर्णय जाहीर केला जाईल, अशी माहिती समता परिषदेचे विभागीय अध्यक्ष प्रितेश गवळी (Pritesh Gavli) यांनी पत्रकार परिषदेत दिली.(Chhagan Bhujbal)

https://www.facebook.com/share/v/z6kau4oJTzHuXBCK/?mibextid=qi2Omg

पत्रकार भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेप्रसंगी समता परिषदेच्या मंजिरी घाडगे, वैष्णवी सातव, सागर दरोडे, प्रदीप घुमे आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
गवळी म्हणाले, नाशिक मतदारसंघातून समता परिषदेचे नेते छगन भुजबळ यांनी माघार घेतली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांनी त्यांची उमेदवारी जाहीर केली.
यानंतरही काही आठवडे येथील महायुतीच्या नेत्यांनी त्यांचे नाव जाहीर केले नाही.
भुजबळ हे देशपातळीवरील ओबीसी समाजासाठी लढणारे नेते आहेत.
त्यांनी पक्षीय भुमिकेपेक्षा नेहमीच ओबीसी समाजाच्या हिताच्या भुमिकेला प्राधान्य दिले आहे. त्यांना माघार घेण्याच्या निर्णयाप्रत येण्यासाठी महायुतीतून प्रयत्न झाले. त्यांची नावे दोनच दिवसांत समोर येथील. ओबीसी नेतृत्वाला अशी वागणूक दिल्याबद्दल महायुतीचा निषेध करतो.

डॉ.अमोल कोल्हे आणि रवींद्र धंगेकर यांना पाठींबा

पुणे जिल्ह्यात शिरूर मधून डॉ. अमोल कोल्हे आणि पुणे लोकसभा मतदारसंघातून रवींद्र धंगेकर हे दोन ओबीसी समाजाचे उमेदवार आहेत. ओबीसी समाजसंघटना त्यांच्या पाठीशी राहाणार. येत्या दोन दिवसात भुजबळ आम्हाला दोन दिवसांत निर्णय देतील, त्यानुसार आमची पुढची वाटचाल राहील, असेही प्रितेश गवळी यांनी यावेळी सांगितले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ajit Pawar | ‘पूर्वी आम्ही घास घास घासायचो, इकडे आलो तर…’, अजित पवारांची तुफान फटकेबाजी

Amol Kolhe On Ajit Pawar | 23 जागांचा निर्णय घेणाऱ्या नेतृत्वाला चारच जागा मिळतात ही शोकांतिका – डॉ. अमोल कोल्हे (Video)

Minor Girl Rape Case Pune | पुणे : मैत्रीचा गैरफायदा घेऊन अल्पवयीन मुलीवर बलात्कार