Chhagan Bhujbal | नाशिक पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीचा विजय निश्चित – छगन भुजबळ

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन – Chhagan Bhujbal | राज्यातील विधानपरिषद निवडणुकीच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणुक चुरशीची होणार आहे. त्यातच नाशिक पदवीधर मतदारसंघाची (Nashik Graduate Constituency) लढाई ही आता महाविकास आघाडी आणि सत्यजीत तांबे (Satyajit Tambe) यांच्यासाठी प्रतिष्ठेची राहणार आहे. असं बोललं जात आहे. त्यातच महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजीत सभेत बोलताना राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी नाशिकची जागा महाविकास आघाडीचा उमेदवारचं जिंकणार. असा विश्वास व्यक्त केला आहे.

पदवीधर निवडणुकांची तारिख जवळ येत असून प्रचारसभांनी जोर धरला आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांचा देखील प्रचार जोरदार चालला असून महाविकास आघाडीचे सर्व नेते त्यांच्या प्रचारार्थ एकवटले आहेत. नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत एक बैठक पार पडली. या बैठकीत उमेदवार शुभांगी पाटील (Shubhangi Patil) तसेच राष्ट्रवादी (NCP) आणि शिवसेना (Shivsena) पक्षाचे नेते उपस्थित होते. पण काँग्रेस (Congress) नेत्यांनी या बैठकीला उपस्थिती लावली नसल्याचे दिसून आले.

यावेळी उपस्थितांना संबोधित करताना छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) म्हणाले की, ‘शिक्षक आणि पदवीधरांच्या प्रश्नांची जाण शुभांगी पाटील यांना आहे. पदवीधर मतदारसंघात पहिल्या महिला उमेदवार म्हणुन त्यांचा विजय निश्चित असून विजयाचा गुलाल उधळण्यासाठी पुन्हा आपल्याला एकत्र यायचे आहे. तोपर्यंत सर्वांनी परिश्रम घेऊन निवडणुकीला सामोरे जायचे आहे, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही महाविकास आघाडीतील घटक पक्ष म्हणून पूर्ण ताकदीने उभी राहील.’ अशी भूमिका यावेळी बोलताना छगन भुजबळ यांनी स्पष्ट केली.

यावर पुढे बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, ‘पदवीधर निवडणूक ही आगामी निवडणुकांमधील
महाविकास आघाडीचा पाया असून सर्व पदवीधर मतदारांनी महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील
यांना निवडून द्यावे, तसेच, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी देखील महाविकास आघाडीच्या
सर्व घटकांनी तयारीला लागावे. आपली एकजूट टिकवून ठेवत आघाडी अधिक मजबूत करावी,
असे आवाहन त्यांनी यावेळी बोलताना महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना केले.
उमेदवारी मिळून देखील अर्ज न भरणे ही पक्ष विरोधी घेतलेली भूमिका अतिशय चुकीची आहे.
त्यामुळे जनमानसात असलेल्या प्रतिमेला तडा गेला आहे. त्यामुळे मतदारांनी किती विश्वास ठेवावा?
असा सवाल देखील यावेळी बोलताना छगन भुजबळ यांनी उपस्थित केला.

तसेच यावेळी बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, शुभांगी पाटील या महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार आहेत. काही कारणामुळे मी नाशिकला येवू शकलो नाही. पण आता कामाला सुरूवात केली आहे.
असं यावेळी बोलताना छगन भुजबळ म्हणाले.

Web Title :- Chhagan Bhujbal | victory of mahavikas aghadi in nashik graduate constituency says chhagan bhujbal

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Building Collapse | भिवंडीमध्ये 2 मजली इमारत कोसळून मोठी दुर्घटना; 1 जणाचा मृत्यू

Nagpur Crime | पीडित विद्यार्थिनी सहा महिन्यांची गर्भवती, प्रियकरावर बलात्काराचा गुन्हा दाखल

Shehnaaz Kaur Gill : ‘या’ अभिनेत्रीने तब्बल सहा महिन्यात केले 12 किलो वजन कमी