Shehnaaz Kaur Gill : ‘या’ अभिनेत्रीने तब्बल सहा महिन्यात केले 12 किलो वजन कमी

पोलीसनामा ऑनलाइन : Shehnaaz Kaur Gill | पंजाबची कॅटरिना कैफ म्हणून ओळख असणारी अभिनेत्री शेहनाज गिल आज तिच्या लुकमुळे सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. शेहनाजला बिग बॉस 13 मुळे जास्त प्रसिद्धी मिळाली होती. बिग बॉस मध्ये सिद्धार्थ शुक्ला बरोबर तिची मैत्री प्रेक्षकांना फारच आवडली होती. घरातून बाहेर पडताच शेहनाजने स्वतःच्या फिटनेस कडे विशेष लक्ष देत सर्वांनाच चकित केले आहे.

बिग बॉस मधून बाहेर पडताच शेहनाजने केवळ सहा महिन्यात तब्बल 12 किलो वजन कमी केले आहे. यासाठी तिने कोणतेही जिम किंवा विशेष प्रकारची एक्सरसाइज केलेली नाही. एका मुलाखतीमध्ये शेहनाजने याबद्दल खुलासा केला आहे.

मुलाखती दरम्यान शेहनाजला तिच्या फिटनेस विषयी विचारण्यात आले त्यावेळी शहनाज म्हणाली, “लॉकडाउनच्या काळात माझ्याकडे काहीच काम नव्हते. त्यामुळे माझ्या स्वतःच्या फिटनेस कडे विशेष लक्ष दिले. यावेळी मी कोणतीच जिम किंवा एक्सरसाइज केली नाही. जेव्हा मला मी माझ्या खाण्याकडे विशेष लक्ष दिले. मला दोन चपात्यांची भूक असायची पण मी केवळ मन मारून एकच चपाती खायची. डाळीत मी मुगाची डाळ खायचे. तसेच नॉनव्हेज तर मी पूर्णपणे बंद केले होते. मी तब्बल अर्धे जेवण कमी केले होते. सुरुवातीच्या काळाला याचा मला त्रास झाला. मात्र नंतर या गोष्टींची सवय झाली. या संपूर्ण प्रक्रियेत मी आईस्क्रीम आणि चॉकलेट पूर्णपणे वगळले होते. आता शहनाज लवकरच बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे. तिचे चाहते तिला मोठ्या स्क्रीनवर बघायला आतुर झाले आहेत.

Web Title :- Shehnaaz Kaur Gill | shehnaaz gill birthday how did actress lose her weight

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Parbhani Accident | झेंडावंदनला जाताना रील बनवणं बेतलं जीवावर, भीषण अपघातात एका विद्यार्थ्याचा मृत्यू तर 3 जण गंभीर जखमी

MP Sanjay Raut | ‘मविआत तणाव, मविआचा भाग व्हायचं असेल तर…’, संजय राऊतांचा प्रकाश आंबेडकरांना सल्ला

Maharashtra Politics | नाशिकमधील भाजपचा मोठा नेता ठाकरे गटाच्या वाटेवर; मंत्री दादा भुसेंनी दिल्या अनोख्या शैलीत शुभेच्छा, म्हणाले…