Chhagan Bhujbal | सर्व प्रकल्प गुजरातला गेले आहेत, आता महाराष्ट्रातल्या तरुणांनी आरत्या आणि हनुमान चालिसा पठन करा – छगन भुजबळ

मुंबई: पोलीसनामा ऑनलाइन – महाविकास आघाडी सरकार (Maha Vikas Aghadi Government) पाडून विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी भाजपच्या (BJP) पाठिंब्याने सरकार स्थापन केले. हे सरकार आल्यापासून गेल्या चार महिन्यात चार मोठे प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेले आहेत. त्यामुळे विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मार्मिक भाष्य करत सरकारवर टीका केली आहे. सर्व प्रकल्प गुजरातला गेले आहेत, आता महाराष्ट्रातल्या तरुणांनी आरत्या आणि हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) पठन करा, असे छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) म्हणाले.

वेदांता फॉक्सकॉन (Vedanta Foxconn), बल्क ड्रग पार्क (Bulk Drug Park), मेडिकल डिव्हाईस (Medical Devices) आणि आता टाटा एअरबस (Tata Airbus) हा 22000 कोटी किंमतीचा प्रकल्प गुजरातला गेल्याने विरोधकांनी शिंदे-फडणवीसांना धारेवर धरले आहे. महाराष्ट्रातून एकामगोमाग एक असे चार प्रकल्प गुजरातला गेले. अशा पळवापळवीमुळे राज्यातील युवकांचा रोजगार जातो आहे. त्यामुळे येथील तरुणांनी करायचे काय? तर त्यांनी आता आरत्या करा, हनुमान चालिसा पठण करा, दहिहंडी फोडा, फटाके फोडा अशी मोठी यादी छगन भुजबळांनी (Chhagan Bhujbal) वाचून दाखविली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी याबाबतील लक्ष घालून महाराष्ट्रातील प्रकल्प राज्यातच होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे भुजबळांनी म्हंटले आहे.

छगन भुजबळ यांनी याबाबत पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली. भुजबळ म्हणाले, या प्रकल्पाचा आम्ही पाठपुरावा केला होता. एअर बस हा प्रकल्प 22000 कोटींची गुंतवणूक देणारा होता आणि तो भविष्यात वाढणार देखील होता. गतवर्षी भारताने या कंपनीसोबत करार केला. त्यानंतर मी स्वत: रतन टाटा (Ratan Tata) यांना पत्र पाठविले होते. हा प्रकल्प नाशिकच्या ओझर येथील कारखान्यात तयार करण्याची विनंती केली होती. परंतु कोरोनाच्या काळात सर्व कामे बारगळली.

तसेच एकापाठोपाठ एक प्रकल्प गुजरातला जात आहेत. महाराष्ट्रातील युवकांनी करायचे काय?
देवेंद्र माजी मुख्यमंत्री आहेत. त्यांच्या शब्दाला दिल्लीत मान आहे. एकनाथ शिंदे काही करु शकत नाहीत.
पण देवेंद्र फडणवीस करु शकले असते. मोदींना देशाचे नेते म्हणून वागले पाहिजे.
गुजरातचा विकास आधीच झाला असे म्हणतात, मग आता प्रकल्प नेण्याचे कारण काय,
दिल्लीतील लोकांनी यात लक्ष घातले पाहिजे होते.
आता आम्ही कितीही प्रयत्न केले, तरी झालेला निर्णय मागे घेतला जाणार नाही.

Web Title :- Chhagan Bhujbal | youth of maharashtra recite- hanuman chalisa says chhagan bhujbal

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Zero Interest Loan | मराठा तरुणांना व्यावसायासाठी बीनव्याजी मिळणार कर्ज

Medical Education in Marathi | हिंदीपाठोपाठ आता वैदकीय शिक्षण मराठीतून

Baba Ram Rahim | पॅरोलवर बाहेर आलेल्या बाबा राम रहिमचे नवे गाणे लाँच