Chhatrapati Sambhaji Nagar Coronavirus | छत्रपती संभाजी नगर मध्ये कोरोनाची लागण झालेल्या 65 वर्षीय महिलेचा मृत्यू

पोलीसनामा ऑनलाइन : Chhatrapati Sambhaji Nagar Coronavirus | सध्या राज्यात एन्फ्लुएंझा H3N2 व्हायरसचा (Virus) धोका वाढताना दिसत आहे. तर आता अशातच छत्रपती संभाजीनगर शहरात कोरोनाचे (Chhatrapati Sambhaji Nagar Coronavirus) आकडे दिवसेंदिवस वाढताना पहायला मिळत आहे. संभाजीनगर शहरासह ग्रामीण भागात देखील कोरोनाचे रुग्ण गेल्या काही दिवसांपासून वाढल्याचे दिसून आले आहे. या कोरोनामुळे सुंदरवाडी येथील 65 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार मृत्यू झालेल्या महिलेला महिन्याभरापासूनच सर्दी, ताप, खोकला सुरू होता. त्यानंतर अचानक त्यांना श्वास घेण्यासाठी त्रास होऊ लागला. ताप कमी होत नसल्यामुळे त्यांना लगेच शासकीय घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या महिलेला फुफ्फुसातही जंतुसंसर्ग झाला आणि त्याचा हृदयावर परिणाम झाला. ही महिला थायरॉईडने देखील त्रस्त होती. घाटीत दाखल केलेल्या महिलेची 17 मार्च रोजी आरटीपीसी टेस्ट करण्यात आली ही टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर कोरोना वॉर्डात तिच्यावर उपचार सुरू करण्यात आले. मात्र उपचारादरम्यानच तिचा मृत्यू झाला अशी माहिती प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर (DHO Dr. Abhay Dhanorkar) यांनी दिली.

सध्या संभाजीनगर मध्ये काही दिवसांपासून कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आढळून येत आहे.
त्यातच शुक्रवारी आणखी नवीन 10 रुग्णांची भर पडल्याने हा आकडा 41 वर जाऊन पोहचला आहे.
या सर्व रुग्णांवर संभाजीनगर शहरात उपचार सुरू आहेत.
बहुतांश रुग्णांमध्ये लक्षणे सूक्ष्म असल्यामुळे त्यांच्यावर घरीच उपचार सुरू आहेत.
आता कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येमुळे प्रशासनाने अलर्ट (Alert) जाहीर केले असून पुन्हा एकदा मास्क (Mask)
वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (Chhatrapati Sambhaji Nagar Coronavirus)

Web Title :- Chhatrapati Sambhaji Nagar Coronavirus | chhatrapati sambhaji nagar corona update death of 65 year old corona positive woman died

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Parbhani News | परभणीचे खासदार संजय जाधव यांना दुसऱ्यांदा जिवे मारण्याची धमकी; राजकीय क्षेत्रात उडाली खळबळ

BJP MLA Nitesh Rane | राहुल गांधीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करुन पाकिस्तानात हकलून द्या, आमदार नितेश राणेंचा घणाघात