मुख्यमंत्री झाले माळकरी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

कोट्यवधी लोकांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूरच्या विठूरायाची तुळशीची माळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घातली असून ते आता वारकरी झाले आहेत. सर्वत्र वारकरी संप्रदायाचा सोहळा सुरू झाला आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे प्रमुख मानकरी आणि वासकर घराण्याचे प्रमुख ह.प. भ. राणा महाराज वासकर यांच्याकडून मुख्यमंत्री फडणवीस यांनी अलीकडेच तुळशीची माळ घेतली आहे. आणि ती गळ्यातही घातली आहे. आषाढी एकादशीची वारी हि मुख्यामंत्र्यांनी शासकीय पुजेपुरतीच न करता ती नित्यनेमाने करावी अशी आशा वारकरी संप्रदायाकडून करण्यात आली आहे.

[amazon_link asins=’8190841815′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’c7c3d6eb-80d5-11e8-8df2-33650c0997f3′]

पंढरपूरच्या विठुरायाचा आषाढी एकादशीचा सोहळा हा काही दिवसावर आला आहे. त्यासाठी संतश्रेष्ठ तुकडोजी महाराज यांच्या पालखीची प्रस्थान ठेवले आहे. अलंकापुरी आळंदीतून संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे प्रस्थान आज ठेवले आहे.

आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर त्याची वारकरी संप्रदायांच्या समस्या जाणून घेण्यासाठी ह. प. भ. राणा महाराज वासकर आले होते. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री माळकरी झाले आहेत. असं सांगितलं आहे. ते म्हणाले कि, “मुख्यमंत्री फडणवीस यांनी तुळशीचीमाळ घातली आहे. हि गोष्ट वारकरी संप्रदायासाठी अभिमानाची बाब आहे. पण जर त्यांना वारकरी होण्याचे असेल तर मात्र त्यांना नित्यनेमाने येणाऱ्या काळात पंढरपूरची वारी करावी लागेल.”