मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा आज राजीनामा देण्याची शक्यता

ADV

बंगळरुः वृत्तसंस्था 

कर्नाटकचा राजकिय आखाडा चांगलाच रंगात आला आहे. भाजपाचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी गुरुवारी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर कोर्टाने त्यांना बहुमत सिद्ध करण्याची अंतिम मुदत शनिवारी 4 वाजेपर्यंत दिली होती. मात्र बहुमत सिद्ध करण्यासाठी येडियुरप्पा यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

ADV

काॅंग्रेसच्या आमदारांपैकी दोनच आमदार सध्या सभागृहात गैरहजहर आहेत. त्यामुळे बहुमताचा आकडा गाठण्यासाठी भाजपची चांगलीच दमछाक होताना दिसत आहे. बहुमताच्या आकड्याची जुळवाजूळव करण्यात भाजपला यश येत नसल्यामुळे येडियुरप्पा आज राजीनामा देण्याची शक्यता निर्माण झाली आहे.