Chief Minister of Maharashtra | साताऱ्याने महाराष्ट्राला दिले चार मुख्यमंत्री

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – Chief Minister of Maharashtra | देशाच्या लढ्यात सातारा (Satara) जिल्ह्याचे योगदान मोठे आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातही सातारा कायम राहिला आहे. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री (Chief Minister of Maharashtra ) यशवंतराव चव्हाण (Yashwantrao Chavan) यांच्या पासून ही परंपरा सुरू झाली ती आज अखेर सुरू आहे. आता पर्यंत जिल्ह्याने तीन मुख्यमंत्री दिले आहे. आता यामध्ये आणखी एका नावाची भर पडली ते म्हणजे एकनाथ शिंदे (Eknath Shinde). शिंदे हे चौथ्ये मुख्यमंत्री ठरले आहेत. कारण एकनाथ शिंदे यांचा मतदारसंघ ठाणे असला तरी त्यांचे मूळ गाव हे महाबळेश्वर तालुक्यातील दरे तर्फ तांब आहे.

 

यशवंतराव चव्हाण –
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे होते. कराड विधानसभा मतदार संघातून ते निवडून येत होते. 19 नोव्हेंबर 1962 पर्यंत त्यांनी मुख्यमंत्री पद सांभाळले. त्यानंतर चीनने भारतावर आक्रमण केले. त्यामुळे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी यशवंतराव चव्हाण यांना बोलावून संरक्षणमंत्री केले. (Chief Minister of Maharashtra)

 

बॅ. बाबासाहेब भोसले –
बॅ. बाबासाहेब भोसले हे मूळचे सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील कलेढोण येथील होते. ते सातारा जिल्ह्यातील दुसरे मुख्यमंत्री राहिले होते. 21 जानेवारी 1982 ते 1 फेब्रुवारी 1983 असा त्यांचा कार्यकाळ राहिला.

पृथ्वीराज चव्हाण –
पृथ्वीराज चव्हाण हे महाराष्ट्राचे 21 वे मुख्यमंत्री ठरले. त्यांनी तत्कालीन कराड मतदार संघाचेही नेतृत्व केले होते. 10 नोव्हेंबर 2010 ते 26 सप्टेंबर 2014 असा त्यांचा कार्यकाल राहिला.

 

एकनाथ शिंदे –
महाराष्ट्राचे 25 वे मुख्यमंत्री म्हणून गुरुवारी एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतली. ठाण्यातील कोपरी पाचपाखडी मतदारसंघाचे ते प्रतिनिधित्व करतात. ठाकरे सरकारमध्ये शिंदे हे नगरविकास मंत्री होते.

 

Web Title :- Chief Minister of Maharashtra | satara given the four chief ministers for the maharashtra

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | अँटी करप्शनचे पोलीस असल्याचे सांगून नगररचना उपसंचालकाला लुबाडण्याचा प्रयत्न करणारा नाशिकच्या पोलीस कर्मचार्‍यासह तिघे गजाआड

 

Nanded to Pune Railway | रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर ! नांदेड-हडपसर रेल्वे आता दररोज नांदेड ते पुण्यापर्यंत धावणार

 

Manipur Landslide | मणिपूरमध्ये दरड कोसळल्याने 14 जणांचा मृत्यू; लष्करी जवानांचा समावेश, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले