मुख्यमंत्र्यावर भादवि कलम ३०२ दाखल झाला पाहिजे- अभिमन्यु पवार

गंगापुर : पाेलीसनामा ऑनलाईन

मराठा क्रांती मोर्चाच्या मागणीसाठी कायगाव येथील गोदावरीच्या पुलावरुन उडी मारुन तरुणाने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. कानटगाव (ता. गंगापुर) येथील काकासाहेब दत्तात्रय शिंदे असे त्या अठ्ठावीस वर्षीय तरुणाचे नाव आहे. सोमवारी (ता. 23) दुपारी तीन वाजता हा प्रकार घडला.
[amazon_link asins=’B009WNA9V6′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’2f9f6df3-8e77-11e8-86ea-5396afe9930a’]

औरंगाबाद येथे मराठा क्रांती मोर्चाच्या मागणीसाठी कायगाव येथील गोदावरीच्या पुलावरुन उडी मारुन तरुणाने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. कानटगाव (ता. गंगापुर) येथील काकासाहेब दत्तात्रय शिंदे असे त्या अठ्ठावीस वर्षीय तरुणाचे नाव आहे. सदर घटना सोमवारी (ता. 23) दुपारी तीन वाजता घडलेली आहे.

त्यांनी कायगाव टोका येथील नव्या पुलावरुन उडी मारली होती. जुन्या पुलापर्यंत गटांगळ्या खात हा तरुण वाहत गेला होता. काकासाहेब शिंदे या तरुणाला बाहेर काढले असून प्रकृती गंभीर होती, मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. जीवरक्षक पथकातील दशरथ बिरुटे यांनी त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मराठा क्रांती मोर्चातर्फे समन्वयकांनी गंगापुर तहसील कार्यालयात निवेदन दिले होते. निवेदनात जलसमाधी घेणार असल्याचा इशारा देण्यात आला होता. मात्र, प्रशासनाने त्या निवेदनाची कोणतीही दखल घेतली नसल्याचे समोर आले आहे.

आपत्कालिन रुग्णवाहिका सेवेतून काकासाहेब यांना उपचारासाठी कायगाव टोका येथून गंगापुर येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. तिथे डॉक्‍टरांनी उत्तरीय तपासणीसाठी औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयाकडे रवाना केले आहे. मात्र, त्याचे निधन झाले.

मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही
कानडगाव (ता. गंगापुर) येथील काकासाहेब दत्तात्रय शिंदे (वय 28) या तरुणाने कायगाव टोका येथून गोदावरी पात्रात जलसमाधी घेतली असून आता मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्याशिवाय काकासाहेब यांचा मृतदेह ताब्यात घेतला जाणार नाही. अशी भुमिका येथील मराठा क्रांती मोर्चातील समन्वयकांनी घेतली आहे.

सदर घटनेमुळे महाराष्ट्रातील मराठा समाजात प्रचंड संतापाची लाट निर्माण झालेली असुन या घटनेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत. त्यामुळे त्यांच्यावर भादवी कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष अभिमन्यु पवार यांनी केली आहे.

जाहिरात