मोठी खुर्ची हटवून CM ठाकरे बसले साध्या खुर्चीवर, आपणही सामान्य असल्याचा दिला संदेश

औरंगाबादः  पोलीसनामा ऑनलाईन – निवडणुक अगोदरच झाली असती, असे औरंगाबादेत विविध विकासकामांच्या भूमिपूजनावरून सुरु असलेल्या राजकारणाला मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी उत्तर दिले आहे. ते शनिवारी (दि. 12) भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते. व्यासपीठावर आगमन होताच मुख्यमंत्री ठाकरे यांनी त्यांच्यासाठी ठेवलेली मोठी खुर्ची हटवून इतर मान्यवरांसाठी असलेली खुर्ची ठेवायला सांगितले. ती ठेवल्यार ते खुर्चीवर बसले. यातून आपण वेगळे नाही, आपणही सामान्य आहोत, असा संदेश मुख्यमंत्री ठाकरे यांच्या कृतीतून पाहयला मिळाला.

यावेळी उद्योगमंत्री तथा पालकमंत्री सुभाष देसाई, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पाणीपुरठा तथा स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे, राज्यमंत्री अब्दुल सत्तार, हरीभाऊ बागडे, महापालिका आयुक्त अस्तिककुमार पांडेय आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, प्रत्येक निवडणुकीत पाण्याचा प्रश्न, गुंठेवारीचा, सिडकोतील घरांच्या मालकीचा प्रश्न आदीवर चर्चा होते. ती सोडवायला सांगितले आहेत. आणखी काय करू शकतो याबाबत डोक्यात आकृतीबंध तयार आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक त्यांच्या लाडक्या शहरात होत आहे, असे स्मारकाविषयी मुख्यमंत्री ठाकरे यांनी उद्गार काढले. हिंदुत्व, राष्ट्रीयत्वाचे विचार स्मारक पाहिल्यानंतर नव्या पिढीला कळतील, असे ते म्हणाले.