राज्याच्या मुख्य सचिव पदी वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव डी के जैन

मुंबईः पोलीसनामा आॅनलाईन 

राज्याच्या मुख्य सचिव पदी वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव डी. के. जैन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 25 जानेवारी 1959 साली जन्मलेले डी. के जैन हे मुळचे राजस्थानचे असून 25 आॅगस्ट 1983 रोजी त्यांनी महाराष्ट्र राज्यात सेवेला सुरुवात केली. जैन हे एम टेक मॅकेनिक आणि एमबीए असे शिक्षण पुर्ण केले आहे. मावळते मुख्य सचिव सुनील मलिक यांच्याकडून ते पदभार घेणार आहेत.

राज्यातील भाप्रसे च्या 1983 च्या बॅच मधील सेवा जेष्ठतेनुसार मेधा गाडगीळ, सुधीरकुमार श्रीवास्तव, दिनेश कुमार जैन, यु.पी.एस. मदान, संजीवनी कुट्टे, आणि सुनील पोरवाल यांचा समावेश आहे. मात्र जेष्ठता यादीत तिसऱ्या क्रमांकावर असलेले दिनेश कुमार जैन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.