Chikhali Pimpri Crime | पिंपरी : मौजमजेसाठी दुचाकी चोरणारे तीन अल्पवयीन चोरटे चिखली पोलिसांच्या ताब्यात, 7 दुचाकी जप्त

ADV

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Chikhali Pimpri Crime | मौजमजा करण्यासाठी दुचाकी चोरणाऱ्या (Vehicle Theft) तीन अल्पवयीन मुलांना चिखली पोलिसांनी (Chikhali Police) ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून सात दुचाकी जप्त करुन सहा गुन्हे उघडकीस आणले आहेत. ही कारवाई शुक्रवारी (दि.12) मोरे वस्ती येथील अष्टविनायक चौकात करण्यात आली आहे.

चिखली परिसरात दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. चोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्याच्या दृष्टीने चिखली पोलीस ठाण्यातील तपास पथक चिंचेचा मळा, मोरे वस्ती परिसरात पेट्रोलींग करीत होती. त्यावेळी तीन मुले एकाच दुचाकीवरून संशयित रित्या फिरताना दिसली. पोलिसांना पाहून पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी त्यांचा पाठलाग करुन अष्टविनायक चौकात त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे असलेल्या दुचाकीबाबत खात्री केली असता दुचाकी चोरीबाबत गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाले.

ADV

आरोपी अल्पवयीन असल्याने त्यांच्या पालकांना बोलावून घेऊन मुलांकडे चौकशी केली. चौकशी दरम्यान त्यांनी आणखी सहा दुचाकी चोरल्याची कबुली दिली. तसेच चोरलेल्या दुचाकी कुदळवाडी सर्कल ब्रीजच्या खाली असलेल्या स्पाईन रोड मधील मोकळ्याच जागेत लपुन ठेवल्याचे सांगितले. पोलिसांनी त्या ठिकाणाहून सहा दुचाकी जप्त केला. आरोपींकडून चिखली पोलीस ठाण्यातील पाच तर डायघर पोलीस ठाणे, ठाणे शहर येथील एक असे सहा गुन्हे उघडकीस आले आहेत.

ही कारवाई पोलीस उपायुक्त शिवाजी पवार (Shivaji Pawar DCP), सहायक पोलीस आयुक्त संदीप हिरे
(Sandeep Hire ACP) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर,
सहायक पोलीस निरीक्षक उद्धव खाडे, पोलीस अंमलदार सुनिल शिंदे, बाबा गर्जे, चेतन सावंत, भास्कर तारळकर,
संदिप मासाळ, दीपक मोहिते, अमोल साकोरे, अमर कांबळे, कबीर पिंजारी, संदीप राठोड, संतोष सकपाळ, संतोष भोर,
सातपुते यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Police Raid On Spa Center In Sangvi | सांगवी येथे स्पा सेंटरमध्ये चालणाऱ्या ‘सेक्स’ रॅकेटचा पर्दाफाश, दोन महिलांची सुटका (Video)

Raj Thackeray On Vasant More | वसंत मोरेंबाबत प्रश्न विचारताच राज ठाकरे यांनी ‘अशी’ दिली प्रतिक्रिया, म्हणाले… (Video)