Child Care Leave | केंद्र सरकारचा सरकारी कर्मचाऱ्यांना दिलासा, महिलांप्रमाणेच मुलांची देखभाल करण्यासाठी सिंगल पुरुषांना मिळणार 730 दिवसांची सुट्टी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Child Care Leave | केंद्र सरकारनं (Central Government) सरकारी कर्मचाऱ्यांना (Government Employees) खूप मोठा दिलासा दिला आहे. आता सरकारी कर्मचारी महिला आणि सिंगल पुरुष मुलांची देखभाल (Child Care Leave) करण्यासाठी 730 दिवसांची सुट्टी घेऊ शकतात. केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह (Jitendra Singh) यांनी लोकसभेत (Lok Sabha) ही माहिती दिली आहे.

जितेंद्र सिंह यांनी सांगितलं की, महिला सरकारी कर्मचारी त्यांच्या सेवेदरम्यान मुलांच्या संगोपनासाठी (Child Care Leave) 730 दिवसांची रजा घेऊ शकतात. महिलांप्रमाणेच सिंगल पुरुष कर्मचारी (विधुर व घटस्फोटीत) देखील त्यांच्या मुलांची काळजी घेण्यासाठी त्यांच्या सेवेदरम्यान 730 दिवसांची रजा घेऊ शकतात.

730 दिवसांच्या रजेची तरतूद

जितेंद्र सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय नागरी सेवा रजा नियम (Central Civil Service Leave Rules) 1972 च्या नियम 43-C अंतर्गत नागरी सेवा आणि पदांवर नियुक्त केलेल्या महिला सरकारी कर्मचारी किंवा सिंगल पुरुष सरकारी कर्मचारी देखील बाल संगोपन रजा (CCL) यासाठी पात्र आहेत. बाल संगोपन नियमानुसार, दोन मोठ्या मुलांच्या 18 वर्ष वयपर्यंत 730 दिवसांच्या बाल संगोपन रजेची तरतूद आहे.

सुट्टीसाठी कोण असणार पात्र?

केंद्रीय नागरी सेवा रजा नियम, 1972 च्या नियम 43-C अंतर्गत 730 बाल संगोपन रजेची तरतूद आहे.
यानुसार, नागरी सेवा आणि पदांवर नियुक्त महिला सरकारी नोकर आणि सिंगल पुरुष सरकारी कर्मचारी जे विधुर
किंवा घटस्फोटीत आहेत, असे कर्मचारी या रजेसाठी पात्र आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune News | एनडीए चौकातील रस्ते विकास प्रकल्पाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण

Maharashtra Political News | अजितदादा शरद पवारांमध्ये पुण्यात गुप्त बैठक? महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? चर्चांना उधाण