प्रचारासाठी मुले भाड्याने मिळतील, मंडळाने लावले फलक

सांगली : पोलीसनामा आॅनलाइन
सांगली, मिरज आणि कुपवाड महानगर पालिका निवडणुकीची रणधुमाळी सध्या जोरात सुरु आहे. निवडणूका म्हणलं कि उमेदवार आला, आणि उमेदवार म्हणलं कि कार्यकर्ता आलाच. काही कार्यकर्ते निष्ठावान असतात परंतु या सोबतच निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी पैसे देऊनही कार्यकर्ते बोलवावे लागतात. तेच कार्यकर्ते गोळा करण्यासाठी उमेदवारांची कसरत सुरु आहे.
[amazon_link asins=’B0756W2GWM’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’ed6e6241-7eb3-11e8-8aca-0762f54b64a9′]
निवडणुकीच्या प्रचारात प्रामुख्याने तरुण पिढीला जास्त मागणी असते, उमेदवाराचे माहिती पत्रक, स्लिप घरोघरी पोहचवणे, झेंडे घेऊन उमेदवाराची घोषणा बाजी करणे,  या सर्व गोष्टी पाहता  सांगलीतील एका मित्र मंडळाने निवडणुकी साठी मुले भाड्याने पुरवण्याचा व्यवसाय सुरु केला आहे. सांगलीतील हरिपूर रोड वर मंडळाने चक्क फलक लाऊन आवाहन केले आहे. प्रत्येकी हजार रुपये हजेरी असे त्या फलकावर दर्शविले आले आहे. त्या फलकाची शहरात सध्या जोरदार चर्चा आहे.

You might also like