‘ड्रॅगन’नं पुन्हा दाखवला ‘रंग’, करार तोडत चीननं गुप्तपणे LAC वर वाढवली सैनिकांची संख्या

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : भारत आणि चीनमधील (china) संघर्ष रोखण्यासाठी आणि दोन्ही देशांमधील विश्वास वाढविण्यासाठी पीपल्स लिबरेशन आर्मीने सप्टेंबर -2020 मध्ये एक करार केला होता, जो आता गुप्तपणे मोडला जात आहे. पूर्वेच्या लडाखमध्ये चिनी सैन्याने आपले स्थान अधिक मजबूत केले आहे. याव्यतिरिक्त, चिनी सैन्याने गुप्तपणे वास्तविक नियंत्रण रेषेजवळ (एलएसी) तणावग्रस्त भागात सैन्याची जमवाजमव केली आहे. दोन देशांदरम्यान हा करार फक्त चार महिन्यांपूर्वीच झाला होता. दोन्ही देश तणावग्रस्त आघाडीवर सैन्याची संख्या वाढविणार नाहीत, असे यात म्हटले होते. ताज्या तपासणीत असे दिसून आले आहे की, 21 सप्टेंबर 2020 रोजी सहाव्या फेरीच्या चर्चेनंतर चीनी सैन्याने जारी केलेले संयुक्त निवेदन नाकारले आहे. एवढेच नव्हे तर त्याने शांतपणे बरेच प्रयत्न केले आहेत.

वरिष्ठ कमांडर स्तरावरील चर्चेच्या सहाव्या फेरीच्या दुसर्‍याच दिवसानंतर भारत आणि चीनने संयुक्त निवेदन जारी केले की, ते सीमेवर सैन्यांची संख्या वाढवण्यास नकार देत आणि जमिनीवरील परिस्थितीत एकतर्फी बदल टाळण्यासाठी सहमती दर्शविली आहे. प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकानुसार भारत आणि चीन यांनी यावर सहमती दर्शविली होती की दोन्ही देश नेत्यांद्वारे पार पडलेल्या महत्त्वपूर्ण सहमतीची प्रामाणिकपणे अंमलबजावणी करतील, जमिनीवर संवाद मजबूत करतील, गैरसमज व चुकीचे निर्णय टाळतील, मोर्चावर अधिक सैन्य पाठविणे थांबवू, जमिनीवर परिस्थितीत एकतर्फी बदल घडवून आणणे टाळू आणि सर्व क्रिया टाळू ज्यामुळे परिस्थिती आणखी खराब होईल.

मात्र, चार महिन्यांनंतर पुन्हा एकदा परिस्थिती त्याच ठिकाणी पोहोचली आहे. दोन्ही देशांमधील विश्वास निर्माण करण्यासाठी केलेला करार आता पूर्णपणे निरर्थक झाला आहे. भारतीय लष्कराकडेही इतर कोणताही पर्याय नव्हता याची पुष्टी लष्कराच्या सूत्रांनी केली आहे. त्यामुळे सर्व तणावग्रस्त भागात भारतीय लष्करी जमावत वाढ करण्यात आली आहे. काही क्षेत्रात चीनची वाढती पावले लक्षात घेता भारताने यापूर्वीच खबरदारीच्या उपाययोजना केल्या आहेत. यावेळी लडाखच्या खोऱ्यातील तापमान मायनस 30 अंशांपर्यंत खाली गेले आहे. परंतु दोन्ही बाजूंकडून सैन्यात कोणतीही कपात झालेली नाही. हिवाळ्यामुळे सीमेवर शांतता आहे, पण तणाव अजूनही कायम आहे.

दरम्यान, गेल्या नऊ महिन्यांपासून भारत आणि चीनमध्ये तणावाची परिस्थिती आहे. पूर्व लडाखमध्ये दोन्ही बाजूंकडून सैन्य आणि शस्त्रास्त्रांची भारी तैनात करण्यात आली आहे. सीमेवर भारताने तोफखाना, बंदुका आणि सशस्त्र वाहने तैनात केली आहेत. दोन्ही देशांदरम्यान 8 फेऱ्यांची चर्चा झाली आहे, परंतु लडाखमधील गतिरोधावर तोडगा निघालेला नाही. गेल्यावर्षी मे महिन्यात चीनच्या सैन्याने जेव्हा पॅंगॉन्ग तलावावर आपला दावा वाढवण्याचा प्रयत्न केला होता तेव्हा दोन देशांमधील तणावास प्रारंभ झाला होता. या दरम्यान दोन्ही सैन्यांमध्ये चकमक झाली. यावेळी चीनशिवाय भारताचे काही सैनिकही जखमी झाले. 15 जून 2020 रोजी चीनी सैन्याने गलवान खोऱ्यात गस्त घालत भारतीय सैन्यासोबत विश्वासघात करून हल्ला केला. या हल्ल्याला भारतीय सैन्याने चोख प्रत्युत्तर दिले. या हल्ल्यात भारताच्या 20 सैनिकांनी बलिदान दिले. बरेच चिनी सैनिकही मारले गेले, त्यांनी ही वस्तुस्थिती मान्य केली, परंतु मारल्या गेलेल्या सैनिकांच्या संख्येबाबत चीनने मौन बाळगले.