लडाखच्या 38000 स्क्वेअर किमी भूभागावर चीनचा कब्जा ? सरकारनं दिले संसदेत ‘हे’ स्पष्टीकरण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चीनने लडाखचा जवळपास ३८,००० स्क्वेअर किलोमीटरच्या भूप्रदेशावर कब्जा मिळवल्याची माहिती भारत सरकारकडून देण्यात आली. केंद्रशासित प्रदेश जम्मू-काश्मीर आणि अरुणाचल प्रदेश व लडाख हे भारताचे अभिन्न अंग असल्याचे भारत सरकारने संसदेत सांगितले.

सध्या लोकसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असून एका प्रश्नाचं लिखित स्वरूपात उत्तर देण्यात आलं असून, भारत सरकारनं पाकिस्तानला जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप न करण्याची तंबी दिलीय.

भारत आणि चीन दरम्यान आंतराष्ट्रीय सीमेचा वाद आहे. अरुणाचल प्रदेशाच्या पूर्व सेक्टर मधील ९० हजार स्क्वेअर किलोमीटरच्या भूप्रदेशावर चीन दावा करतो. चीनच्या कब्जात भारताचा जवळपास ३८ हजार स्क्वेअर किलोमीटर भूप्रदेश आहे, अशी माहिती परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांनी संसदेत दिली.

भूप्रदेश भारताचा…
पाकिस्तान आणि चीनने २ मार्च १९६३ रोजी तथाकथित ‘सीमा करार’अंतर्गत इस्लामाबादनं पाकव्याप्त काश्मीरचा ५१८० स्क्वेअर किलोमीटरचा भारतीय भूप्रदेश चीनला देऊन टाकला, अशीही माहिती त्यांनी संसदेत दिली.

अरुणाचल प्रदेश आणि केंद्रशासित जम्मू-काश्मीर व लडाख हे भारताचे अभिन्न अंग आहेत आणि भविष्यातही राहतील. याची समज चीनला अनेकदा देण्यात आली आहे असं केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधन यांनी दिली. ते संसदेत १९९४ मध्ये पाकव्याप्त काश्मीरवर संमत एका प्रस्तावावर उत्तर देत होते.

पाकिस्तानने बेकायदेशीरणे घेतलेल्या भूप्रदेशावर पण भारत सरकारची नजर आहे. बेकायदेशीर रित्या ताब्यात घेतलेला भूप्रदेश पाकिस्तानने मोकळा करण्याची समज त्यांना दिली असून, पाकिस्तानने या भागात मानवाधिकार उल्लंघन आणि कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप न करण्याची चेतावणी दिली आहे असं त्यांनी एका प्रश्नच उत्तर देताना स्पष्ट केलं.