Corona Virus : कोरोना व्हायरसविरूध्द कसं ‘लढलं’ केरळ, WHO नं केली भारताची ‘प्रशंसा’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोणत्याही आरोग्य सेवादात्याला रोग संसर्ग रोखण्यासाठी रुग्णाला घरात एकांतात ठेवणे सोपे नसते. यात संशयित रुग्णांना कुटूंबापासून आणि मित्रांपासून वेगळे ठेवण्यास तयार करावे लागते. रोगींनी स्पर्श केलेल्या वस्तू नीट स्वच्छ कराव्या लागतात. हे आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांच्या आणि संसर्गजन्य रुग्णांमधील विश्वासाचे आदान प्रदान आहे.

चीनमधून भारतात प्रवेश करणाऱ्या कोरोना व्हायरसमुळे केरळमध्ये 3 रुग्णांना संसर्ग झाल्याने 3 फेब्रुवारीला राज्यात आपातकालीन घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर आरोग्य कार्यकर्त्यांनी जिल्हा प्रशासनाच्या मदतीने 3,420 लोकांना घरापासून वेगळे करुन उपचार केले आणि 27 लोकांना सुरक्षित ठिकाणी देखरेखीत ठेवण्यात आले.

चीनमध्ये वुहानमध्ये कोरोना व्हायरस पसरल्याने शाळांना सुट्या देण्यात आल्या आहेत. 2018 साली निपाह व्हायरसच्या प्रकोपाने रुग्णांसह नर्स असे एकूण 17 लोकांचा मृत्यू झाला होता.

निपाह व्हायरस पसल्यानंतर केरळने या महामारीवर नियंत्रण मिळवले होते आणि डब्ल्यूएचओकडून त्यांचे कौतूक करण्यात आले होते. परंतु आता परिस्थिती वेगळी आहे. कोरोना नियंत्रणासाठी राज्यात सार्वजनिक जागरुकता निर्माण करण्याचे काम केले जात आहे. 25 जानेवारीला आरोग्य मंत्री के. के. शैलजा यांच्या अध्यक्षतेत एका उच्च स्तरीय बैठकीत चीनमधून आलेल्यांचा शोध घेऊन त्यांचा तपास करण्याचा निर्णय घेतला होता. चीनमधून परत आलेल्या लोकांना तपासणीसाठी घेऊन येणं हे मोठं आव्हान होतं त्यासाठी 123 हेल्थ केअर टीम तयार करण्यात आली आहे. मंत्री म्हणाल्या होत्या की आम्ही व्हायरस रोखण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करत आहोत आणि उच्च जोखिम श्रेणीतील लोकांना 28 दिवस घरी राहण्याचे आवाहन करण्यात आले होते.

या दरम्यान राज्यभरात 21 मोठ्या रुग्णालयात 40 बेड असलेले आयसोलेशन वार्ड स्थापित करण्यात आले आहे आणि प्रत्येक जिल्ह्यात एक हेल्पलाइन सुरु करण्यात आली आहे. रोज या रुग्णांची तपासणी करण्यात येत आहे. राज्याने सर्व संशयितांची तपासणी केली आहे आणि पुण्यातील नॅशनल वायरोलॉजी इंस्टीट्यूटला परिक्षणासाठी पाठवली आहे.

एनवीआयने तपासणी प्रक्रिया वेगवान करण्यासाठी राज्यात अलाप्पुझामध्ये एक परिक्षण प्रयोगशाळा स्थापित केली आहे. आरोग्य विभागाचे प्रमुख सचिव डॉ. राजन खोबरागडे म्हणाले की एनसीओवीने या रोगावर कोणतीही लस तयार केलेली नाही. उच्च स्तरीय तपासणी, होम क्वॉरन्टीन आणि राज्यभरात रुग्णालयात विविध वार्डमध्ये संक्रमण रोखणे आमची प्राथमिकता आहे.

आरोग्य तपासणी तसेच आरोग्य विभागाला परवानग्या देणे यासाठी 143 सदस्यांची टीम तैनात करण्यात आला आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की टीमने जेव्हा सामान्य लोकांशी चर्चा केली तेव्हा अनेकांनी सहकार्य केले. लोकांनी तर विवाह देखील पुढे ढकलले.

राज्यातील अपातकाल हटावण्यात आला आहे. 14 रुग्णांना अद्यापही आयसोलेशन वार्डमध्ये ठेवण्यात आले आहे. आरोग्य विभागाने 345 नमुने एनव्हीआयला पाठवले आहेत यातील 326 रिपोर्ट नेगेटिव्ह आले. मंत्री शैलजा यांनी सांगितले की, आम्ही आणखी काही काळ आमची सतर्कता कायम ठेवू. जो पहिला व्यक्ती तपासणीत पॉजिटिव्ह आढळला होता, तो दुसऱ्या तपासणीत नेगेटिव्ह आढळला. आणखी दोघांना व्हायरस झाल्याचे स्पष्ट झाले होते, त्यांची प्रकृती आता ठीक आहे.