अमेरिकेनं बंदी घातलेल्या चीनी नेत्यांच्या यादीत हाँगकाँगच्या नेत्या कॅरी लॅम यांचा समावेश, मालमत्ता होणार जप्त

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चीनने हाँगकाँगमध्ये राष्ट्रीय सुरक्षा कायदा लागू केल्यावर चीनी अधिकाऱ्यांवर बंदी घालण्याच्या अमेरिकन अधिकाऱ्यांच्या यादीत हाँगकाँगच्या नेत्या कॅरी लॅम यांचे नाव देखील आहे. हाँगकाँगच्या मुख्य कार्यकारी कॅरी लॅम यांच्याव्यतिरिक्त अमेरिकेने चीन आणि हाँगकाँगमधील १० स्थानिक नेत्यांवर बंदी घातली. अमेरिकेचे ट्रेझरी सेक्रेटरी स्टीव्हन न्यूचिन्ह म्हणाले, ‘हे पाऊल हाँगकाँगच्या स्वायत्ततेला लक्ष्य करण्यासाठी घेण्यात आले. अमेरिका हाँगकाँगच्या जनतेबरोबर आहे.’

अमेरिकेने ज्या चिनी अधिकाऱ्यांवर बंदी घातली आहे, त्यात हॉंगकॉंगचे पोलिस आयुक्त आणि अनेक राजकीय सचिवांचाही समावेश आहे. या अधिकाऱ्यांची संपत्ती जप्त केली जाईल.