सिक्किममध्ये १५ ऑगस्टला भारतीय सैन्यासह चीनी सैनिकांनी साजरा केला स्वातंत्रता दिवस

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताच्या ७३ व्या स्वातंत्र दिनाच्या दिवशी काल देशभरात मोठ्या प्रमाणात जल्लोष पाहायला मिळाला. यावेळी भारताला जागतिक स्तरावरून देखील मोठ्या प्रमाणात अनेक देशांनी शुभेच्छा दिल्या. इजरायल आणि रशिया सारख्या बलाढ्य राष्ट्रांनी भारताला या विशेष दिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर सर्वांना चकित करणारे काही फोटो समोर आले असून यामध्ये सिक्कीममध्ये भारत आणि चीन सीमावादाच्या पार्श्ववभूमीवर हे फोटो भारतीयांना दिलासा देणारे आहेत.

येथील सीमेवर चिनी सैनिकांनी भारतीय सैनिकांसमवेत स्वातंत्र दिन साजरा केला. त्याचबरोबर त्यांनी या मंगल दिवशी केक देखील कापला. ‘नाथू ला पास’ च्या जवळ चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या जवानांसोबत मिळून भारतीय सैनिकांनी देखील हा आनंद साजरा केला. त्याचबरोबर भारतासह चीन, ऑस्ट्रेलिया आणि अन्य देशांत भारतीयांनी तिरंगा फडकावत भारताचा स्वतंत्रदिन उत्साहात साजरा केला. त्याचबरोबर देशभक्तीपर गीते देखील म्हटली.

रशियाने दिल्या शुभेच्छा 
रशियाचे राष्ट्रपती  व्लादिमीर पुतिन यांनी भारताच्या ७३ व्या स्वातंत्रदिनाच्या शुभेच्छा दिल्या. काल पुतीन यांनी शुभेच्छा देताना म्हटले की, खरोखरच भारताने प्रत्येक क्षेत्रात प्रगती केली असून आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील स्थापन केलेल्या आपल्या स्थानाचा आम्हाला गर्व आहे. व्लादिमीर पुतिन यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद, त्याचबरोबर सर्व भारतीयांना शुभेच्छा दिल्या. सर्वच क्षेत्रात प्रगती केल्याबद्दल सर्व भारतीयांचे अभिनंदन.

दरम्यान, रशियाबरोबरच इजराईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी देखील भारतीयांना ७३ व्या स्वातंत्रदिनाच्या शुभेच्छा दिल्या.

आरोग्यविषयक वृत्त –