‘LAC वरून लष्कर मागे हटण्याचे चीनचे प्रपोजल एक सापळा’, भारताने केला रिजेक्ट

नवी दिल्ली : चीनचा पूर्व लडाख सीमेच्या आठ पर्वतांना नो ट्रूप एरिया घोषित करण्याचा प्रस्ताव भारताने स्वीकारला नाही. चीनने पूर्व लडाखच्या सीमेवरील आठ पर्वत, जे पॅगाँग सरोवराच्या सभोवताली आहेत, त्यांना नो मॅन्स लँड किंवा नो अ‍ॅक्टिव्हिटी बफर झोन घोषित करण्याचे प्रपोजल दिले आहे.

आठ पर्वतांपैकी निम्म्यापेक्षा जास्त भारताकडे
हा चीनचा प्रस्ताव भारतासाठी कोणत्याही प्रकारे फायद्याचा ठरू शकत नाही. 5 मे 2020 ला चीनी सैनिकांनी लाइन ऑफ अ‍ॅक्च्युअल कंट्रोल (एलएसी)वर शांतता राखण्यासाठी 30 वर्षांपूर्वी करण्यात आलेल्या लेखी कराराचे उल्लंघन करण्यापूर्वी या आठ पर्वतांपैकी अर्ध्यापेक्षा जास्त भारताच्याच नियंत्रणात होते.

भारतीय सैनिक या आठ पर्वतांवर गस्त घालत होते. आता चीनी लष्कराचे कमांडर शांतीच्या नावावर भारतीय लष्कराला पाठीमागे जाण्याचा प्रस्ताव देऊन सुमारे सहा महिने अगोदरच भारताच्या नियंत्रणात असलेल्या या भागाला नो ट्रूप एरिया घोषित करण्याबाबत बोलत आहेत.

आता भारतीय आणि चीनच्या पिपुल्स लिब्रेशन आर्मी फिंगर-4 वर एकमेकांसमोर तैनात आहेत. तिकडे, चीन फिंगर-8 पर्यंत बांधकाम करत आहे. भारतीय लष्कर आणि चीनी लष्कर गोग्रा हॉट स्प्रिंग एरियापर्यंत तैनात आहे.

’चीनी लष्कराचा हा प्रस्तवा आम्ही नाकारला
हिंदुस्तान टाइम्समधील एका रिपोर्टनुसार, एका लष्करी अधिकार्‍याने सांगितले की, चीनी लष्कराचा हा प्रस्ताव आम्ही नाकारला आहे. आम्ही चीनला एलएसीवर शांतता ठेवण्यासाठी लेखी नियमाचे उल्लंघन करण्यासाठी परवानगी देऊ शकत नाही. आम्हाला वाटते की, चीनी लष्कर 5 मे 2020 च्या अगोदर ज्या स्थानावर होते, तिथे परत जावे. नरवने यांनी पूर्व लडाखमध्ये तैनात सैनिकांना भेटून परतल्यानंतर असे म्हटले.

आर्मी चीफ यांनी केला फारवर्ड एरियाचा दौरा
बुधवारी आर्मी चीफ एमएम नरवणे यांनी पूर्व लडाखच्या परिसराचा दौरा केला. यामध्ये कैलास रेंजच्या रेजगांग ला आणि रेचिन पर्वतांचा सुद्धा समावेश होता. हे ते पर्वत आहेत ज्यावर 29 ऑगस्टला भारतीय लष्कराने कब्जा मिळवला होता. येथे आर्मी चीफ बर्फाच्छदीत पर्वतांवर तैनात सैनिकांची स्थिती जाणून घेण्यासाठी गेले होते. त्यांनी परतल्यानंतर म्हटले की, तिथे तैनात सर्व सैनिक फिट आहेत.