एकापेक्षा जास्त वेळा टॉयलेटला गेल्यास कर्मचाऱ्यांनी दंड भरावा; ‘या’ चीनी कंपनीचा अजब फर्मान

बिजींग : वृत्तसंस्था –  एका चीनी कंपनीने (china company)  आपल्या कर्मचाऱ्यांना एक असा अजब आदेश दिला आहे, तो ऐकून तुम्हालाही धक्का बसेल अन् हसू येईल. आता तुम्ही विचार करत असाल या कंपनीने कर्मचाऱ्यांना काय आदेश दिला असेल? तर थांबा आम्ही तुम्हाला याचबाबत सांगत आहोत, या कंपनीने दिलेल्या अशाप्रकारच्या आदेशाने कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली आहे.

चीनच्या गुंआंगडोंग परिसरातील दोंगगुआन स्थित अंपू इलेक्ट्रॉनिक्स साइन्स एँड टेक्नॉलॉजी या कंपनीने हा अजब आदेश दिला आहे. कर्मचारी आळसी असतात, त्याच्या कामाच्या कौशल्यात सुधारणा आणण्यासाठीच एकावेळेपेक्षा जास्त टॉयलेट ब्रेक घेतला तर त्याला दंड आकारावा, असे आदेश दिले आहेत.

कर्मचाऱ्यांना एका वेळेपेक्षा जास्त वेळा टॉयलेटला जाण्यासाठी ब्रेक घेतला तर 20 युआन दंड आकारण्यास कंपनीने सुरुवात केली आहे. कर्मचाऱ्यांची अशी वर्तवणूक ही कंपनीच्या शिस्तीविरोधात असल्याचे कंपनीने म्हणणे आहे. कंपनीने 20 आणि 21 डिसेंबर रोजी 7 कर्मचाऱ्यांना अशाप्रकारे दंड लावला आहे. हा नियम चार्ली चॅपलिनचा बहुचर्चित सिनेमा मॉडर्न टाइम्समधील संबंधित पाहिलं जात आहे. कंपनीने लावलेल्या या अजब नियमांची चौकशी करण्याचे आदेश स्थानिक प्रशासनाने दिले आहेत. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार हा नियम अवैध आहे. त्यांनी कंपनीला आदेशात सुधारणा करण्यास सांगितले आहे. ज्या कर्मचाऱ्यांकडून अशाप्रकारे दंड घेतला आहे त्यांना पुन्हा परत करावा असे म्हटले आहे.

याबाबत कंपनीचे व्यवस्थापक काओ म्हणाले की, कंपनीने कर्मचाऱ्यांना दंड भरावा असे सांगितले नाही. तर दंड त्यांच्या मासिक वेतनातील बोनसमधून वजा केले जाणार आहे. कंपनीला हा निर्णय यासाठीच घ्यावा लागला की काही कर्मचारी वारंवार टॉयलेटला जाऊन सिगारेट ओढतात आणि कामाची वेळ योग्यरित्या पाळत नाहीत. आम्ही मजबूर आहोत, पण सत्य आहे की, हे कर्मचारी आळसी होते, व्यवस्थापनाने त्यांना नेहमी समज दिली परंतु त्यांच्या वागणुकीमध्ये कोणताही बदल झाला नाही. त्यामुळे कंटाळून कंपनीला अशारितीने निर्णय घ्यावा लागला आहे.