Chiplun Flood | कोकणात पावसाचा कहर ! चिपळूणमध्ये पूरपरिस्थिती, अनेक घरे पाण्याखाली; 2005 ची पुनरावृत्ती होण्याची भीती

चिपळून न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  राज्यभरात पावसानं दमदार हजेरी लावली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. कोकणात परिस्थिती (Heavy rain in Konkan) चिंताजनक झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूणची परिस्थिती (Chiplun Flood) खूपच बिकट बनली आहे. मुसळधार पावसानं चिपळूणच्या वाशिष्ठी (Vashisht River) आणि शिव नदीला आलेल्या पूराने चिपळूण शहराला वेढा दिला आहे. त्यामुळे चिपळूण शहरात जवळपास 5 हजार लोक अडकून पडले आहे. चिपळूण शहरात पूराची परिस्थिती (Chiplun Flood) निर्माण झाल्याने 2005 ची पुनरावृत्ती होते की काय याची भीती निर्माण झाली आहे.

कोकणात मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळ नद्यांनी आपली धोक्याची पातळी ओलांडली आहे.
नद्यांचे पाणी चिपळूण शहरात (Chiplun City) शिरले आहे.
त्यामुळे शहरातील सर्व दुकाने, तसेच घरांत पाणी शिरले आहे. अनेक घरे पाण्याखाली गेली आहेत.
घरे तसेच इमारतींचे तळमजले हे पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत.
चिपळूण शहराला पाण्याचा वेढा पहायला मिळत आहे.
चिपळूण शहरात जाण्याचे सर्व मार्ग बंद झाले आहेत. त्यामुळे मदतीचे मार्ग देखील बंद झाले आहेत.
दरम्यान एनडीआरफची (NDRF) तुकडी पुण्याहून चिपळुणात दाखल झाली आहे.

खेडमध्ये पाच फुट पाणी

चिपळूणसह खेड (Khed) आणि रत्नागिरीतील (Ratnagiri) इतर परिसरात देखील पुरस्थिती निर्माण झाली आहे. खेडमध्ये पाच फुटांपेक्षा जास्त पाणी शिरले आहे.
चिपळूण आणि खेड या दोन्ही बाजारपेठा पाण्याखाली आहेत.
याच दरम्यान हवामान खात्याने चार दिवस हाय अलर्ट राहण्याचा इशारा दिला आहे.
त्यामुळे 26 जुलै 2005 ला ढगफुटी झाल्याप्रमाणे यंदाही तशीच परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

वाहतुकीवर परिणाम

मुंबई-गोवा महामार्ग (Mumbai-Goa Highway), कराड रोड मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.
मुंबई गोवा महामार्गावरील ब्रिटिशकालीन बहादूर शेख पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
तर रत्नागिरीत चिपळूणपर्यंतच कोकण रेल्वे (Konkan Railway) वाहतूक सुरु आहे.
पुढे सर्व गाड्या चिपळूण रेल्वे स्थानकातच खोळंबल्या आहेत.

अलसुरे मोहल्ल्यात नागरिक अडकले

रत्नागिरी जिल्ह्यात खेड मधील जगबुडी नदीला पूर आल्याने खेड मधील खाडीपट्टा विभागातील अलसुरे मोहल्ल्याला पुराच्या पाण्याने वेढा दिला आहे.
या मोहल्ल्यात जवळपास 120 पेक्षा अधिक लोक अडकले आहे.
या गावात जाणारे सर्व मार्ग बंद झाल्याने गावात मदत पोहचवण्यास अडचण निर्माण झाली आहे.

Web Title : Chiplun Flood | heavy rain cause havoc in chiplun many houses under water thousands people stranded

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात आणखी घसरण; रेकॉर्ड स्तरापेक्षा 8530 रुपयांनी सोनं ‘स्वस्त’, जाणून घ्या आजचे दर

Pune Crime | संदीप मोहोळ खून प्रकरणात सचिन पोटेसह जमीर शेख, संतोष लांडेला जन्मठेप; गणेश मारणे, राहुल तारूसह इतरांची निर्दोष मुक्तता

Income Tax raid | दैनिक भास्कर वृत्तपत्र समुहाच्या देशभरातील अनेक कार्यालयांवर प्राप्तीकर विभागाचा छापा