Chiranjeevi Konidela | दाक्षिणात्य सुपरस्टार चिरंजीवीला खरचं झाला आहे का कॅन्सर?, ट्विट करत दिली माहिती

पोलीसनामा ऑनलाइन – दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सुपरस्टार (South Superstar) चिरंजीवीला (Chiranjeevi Konidela) कॅन्सर (Cancer) झाला असल्याच्या अफवा अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर (Social Media) रंगत होत्या. अभिनेता चिरंजीवी (Actor Chiranjeevi) यांने आपल्या उत्कृष्ट अभिनयाने सर्वांची मने जिंकली आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांना त्याच्या या कॅन्सरच्या अफवेमुळे चिंता वाटू लागली. मात्र यावर चिंरजीवीने (Chiranjeevi Konidela) स्वत: टविट् करत याबद्दल खुलासा केला आहे.
सुपरस्टार चिरंजीवी कोनिडेला यांचे फॅन फक्त दाक्षिणात्य भागात नसून संपूर्ण देशभर आहे. त्याला कॅन्सर असल्याची अफवा वाऱ्याच्या वेगाने सर्वत्र पसरत होती. त्यामुळे त्याने स्वत: याबद्दल माहिती दिली आहे. चिरंजीवीने ट्वीट करत सांगितलं आहे की, “गेल्या काही दिवसांपूर्वी कॅन्सर सेंटरचं उद्घाटन करताना मी म्हणालो होतो की, कॅन्सरबद्दल जनजागृती करणे (Cancer Public Awareness) आवश्यक आहे. तसेच जर तुम्ही नियमित वैद्यकीय चाचण्या केल्या तर तुमचा बचाव होऊ शकतो. त्यामुळेच मी कोलन स्कोप चाचणी (Colon Scope Test) केली. या चाचणीत नॉन-कॅन्सरस पॉलीप्सचं (Non-cancerous Polyps) निदान झालं आणि नंतर ते काढण्यात आलं. त्यावेळी मी एवढचं म्हणालो होतो की, त्यावेळी चाचणी केली नसती तर कॅन्सर झाला असता. म्हणूनच प्रत्येकाने सावध राहून चाचणी करुन घेतली पाहिजे”. (Cancer Test)
यापुढे त्याने लिहिले आहे की,”माझं बोलणं माध्यमांना कळालं नाही आणि मला कॅन्सर झाला आणि मी कॅन्सरमधून वाचलो, अशा बातम्या प्रचंड व्हायरल झाल्या. अशा खोट्या बातम्यांमुळे (Fake News) अनेक लोक घाबरले आणि दुखावले गेले आहेत”.
चिरंजीवीने ट्विटरच्या (Twitter) माध्यमातून हे स्पष्टीकरण दिल्याने अनेकांनी देवांचे धन्यवाद मानले. त्याच्या या ट्विटवर त्याच् चाहते कमेंट्स करत त्यांना शुभेच्छा देत आहे आणि देवाचे आभार मानत आहेत. चिरंजीवीचा आगामी चित्रपट ‘भोलाशंकर’ (Bholashankar) लवकरच प्रदर्शित होणार आहे. यामध्ये चिरंजीवसह तमन्ना (Tamanna) आणि किर्ती सुरेश (Keerthy Suresh) झळकणार आहेत. प्रेक्षक या सिनेमाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. (Cancer To Chiranjeevi Konidela)
मागील महिन्यांत चिरंजीवीचा ‘वॉलटेर वीरय्या’ (Walter Veeraiya) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.
या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली, तसेच त्याचा ‘गॉडफादर’ (Godfather) हा सिनेमा
आता नेटफ्लिक्स या ओटीटीवर (Netflix) प्रदर्शित झाला आहे. या सिनेमात चिरंजीवीसोबत सत्यदेव(Satyadev),
नयनतारा (Nayantara) आणि ब्रह्माजी (Brahmaji) महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
चिरंजीवीच्या आगामी प्रोजेक्टची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Web Title : Chiranjeevi Konidela | Has South superstar Chiranjeevi really got cancer?, informed by tweeting
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
Maharashtra Politics News | विनोद तावडेंकडून एकनाथ खडसेंना भाजपमध्ये येण्याची ऑफर, खडसे म्हणाले…