Chiranjeevi Covid-19 Positive : साऊथ सुपरस्टार चिरंजीवी ‘कोरोना’ पॉझिटिव्ह !

पोलीसनामा ऑनलाइन – साऊथ सुपरस्टार चिरंजीवी (Chiranjeevi) कोरोना (Covid-19) पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं आहे. खुद्द चिरंजीवीनंच सोशल मीडियावरून याबाबत माहिती दिली आहे. आचार्य या आगामी सिनेमाआधी त्यानं कोरोना टेस्ट केली होती. याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.

आपल्या पोस्टमध्ये चिरंजीवीनं लिहिलं की, प्रोटोकॉलनुसार आचार्यची शुटिंग करण्याआधी मी कोविड टेस्ट केली होती. दुर्दैवानं माझी टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. माझ्यात कोरोनाची कोणतीही लक्षणं नाहीत. सध्या मी होम क्वाॅरंटाईन आहे. जे कोणी गेल्या 5 दिवसांत मला भेटले आहेत, त्यांनी सर्वांनी कोविड चाचणी करावी अशी मी विनंती करतो. मी माझ्या तब्येतीबद्दल अपडेट देत राहील.

https://twitter.com/shyam4sureddy/status/1325668960570765313?s=20

चिरंजीवीनं कोरोना झाल्याची माहिती दिल्यानंतर चाहते आता गेट वेल सून म्हणत तो लवकर बरा व्हावा, यासाठी शुभेच्छा देत आहेत. चाहते त्याला खबरदारी घेण्यासाठी सांगत आहेत. काळजी घेण्याचा सल्लाही देत आहेत.

चिरंजीवीनं अलीकडेच अभिनेता नागार्जुन (Nagarjuna) आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव (K. Chandrashekar Rao) यांची भेट घेतली होती. सिनेमाचे शूटिंग मार्चमध्येच होणार होती; परंतु लॉकडाउनमुळं ते शक्य झालं नाही. काजल अग्रवाल (Kajal Aggarwal) सिनेमात मुख्य भूमिकेत आहे.