Chitra Wagh | शिंदे – फडणवीस सरकारच्या महाराष्ट्रात महिला भयमुक्त – चित्रा वाघ

भंडारा: पोलीसनामा ऑनलाइन – भाजपच्या (BJP) महिलाप्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी भंडाऱ्यात पत्रकार परिषद घेऊन विविध मुद्यांवर भाष्य केले. यावेळी आमच्यासाठी आगामी काळात महिला सुरक्षा हा महत्वाचा मुद्दा असल्याचे चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी सांगितले.

यावेळी बोलताना चित्रा वाघ (Chitra Wagh) म्हणाल्या, महिलांची सुरक्षा हा महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकारच्या (Shinde-Fadnavis Government) एजेंड्यावरील विषय असून, महिलांकडे वाकडया नजरेने पाहणार्‍यांची गय केली जाणार नाही. आम्ही कोणत्याही व्यक्तीगत मुख्यमंत्र्यांला प्रश्न विचारत नाही, तर मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीला प्रश्न विचारत असतो. कोणतेही सरकार काय निर्णय घेते, ते महत्वाचे असते. महिला अत्याचाराच्या घटना घडल्यानंतर सरकारची भूमिका महत्वाची असते. मागील अडीच वर्षात महाविकास आघाडीचे सरकार असताना राज्यात महिला अत्याचार आणि बलात्काराच्या घटना वाढल्या होत्या. त्यावेळी आम्ही महाविकास आघाडी सरकारकडे (Maha Vikas Aghadi Government) विशेष अधिवेशन घेण्याची मागणी केली होती. पण त्यांनी ते घेतले नाही. उलट आमच्यावर गुन्हे दाखल केले.

गोंदियात एका महिलेवर अमानुष अत्याचार झाला आहे. त्याप्रकरणी कर्तव्यात कसूर करणार्‍या पोलीसांवर कारवाई करण्यात आली आहे. नंदुरबारमध्ये एका आदिवासी महिलेवर अत्याचार करण्यात आले, तिथे सुध्दा कर्तव्यात कसूर करणार्‍या पोलीसांना निलंबीत करण्यात आले. पुणे येथील एका महिला दुकानदाराला पोलिसाने मारहाण केली.
त्याप्रकरणात सुध्दा दोषींवर कारवाई करण्यात आली.
त्यामुळे भयमुक्त महाराष्ट्र, भितीमुक्त महाराष्ट्र असे चित्र आता शिंदे-फडणवीस सरकारमध्ये पहावयास मिळत आहे.
राज्यात लहान मुलींना बळजबरीने पळवून नेण्याचे प्रमाण वाढत असून, त्यावर आळा घालण्याकरीता ‘लव्ह जिहाद’ सारखा कायद्याची गरज आहे.
गुजरातप्रमाणे महाराष्ट्रात सुध्दा लव्ह जिहाद (Love Jihad) सारखा कायदा यावा अशी आमची मागणी आहे.
वसई येथील मुलीसोबत घडलेली घटना अंगावर शहारे आणणारी आहे.
दिल्ली पोलीस त्यासंदर्भात योग्य ती कारवाई करीत आहेत.
अशा घटनांवर आळा घालण्यासाठी जनजागृतीची गरज असल्याचेही यावेळी वाघ यांनी सांगितले.

Web Title :-  Chitra Wagh | Shinde-Fadnavis Govt. Women Fearless in Maharashtra

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Georgia Andriani | अरबाज खानची गर्लफ्रेंड जॉर्जियाने केले फोटोशूट, मांडीवरील लाल धनुष्याच्या टॅटूने वेधले लक्ष

CM Eknath Shinde | दिल्लीतील श्रद्धा वालकर खून प्रकरणात मुख्यमंत्री शिंदे यांची प्रतिक्रिया