Cholesterol Level | ‘या’ औषधी वनस्पतींच्या सेवनाने ‘बॅड कोलेस्ट्रॉल’ 2 दिवसात शरिराबाहेर पडेल; जाणून घ्या काय करावं लागेल

पोलीसनामा ऑनलाइन टीम – कोलेस्ट्रॅलचे प्रमाण (Cholesterol Level) विशिष्ट मर्यादेपर्यंत असल्यास त्याचा शरिराला त्रास होत नाही. मात्र, त्याची पातळी वाढली तर काही गंभीर आजारांना सामोरे जावे लागते. म्हणून मर्यादेपेक्षा वाढलेले कोलेस्ट्रॉल (Cholesterol Level) हे शरिराला घातक ठरते. रक्तवाहिन्या (Blood Vessels) कडक होतात किंवा ब्लॉक होतात. अशावेळी तुम्हाला हार्ट स्ट्रोकही (Heart Stroke) येऊ शकतो. आपल्या दैनंदिन आहारात समावेश असलेल्या आयुर्वेदिक औषधी वनस्पती (Ayurvedic Medicinal Plants) आहेत की, त्यांच्या नित्य सेवनाने ही कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवता येते. चला पाहूया कोणत्या औषधी वनस्पती आहेत त्या !

 

आले (Ginger), जिरे ( Cumin), आवळा (Gooseberry), लिंब (Lemon), धणे (Coriander), लसूण (Garlic) आणि बडीशेप (Fennel) या औषधी वनस्पती आहेत. यांचा आपल्या दैनंदिन आहारात कमी जास्त प्रमाणात वापर होत असतो. पण तो चवीनुसार असल्याने त्याचा फारसा परिणाम होत नाही. मात्र, या पदार्थांचे विशिष्ट प्रमाणात सेवन केल्यास दोन दिवसात वाईट कोलेस्ट्रॉल (Bad Cholesterol) तुमच्या शरिरातील रक्तवाहिन्यांमधून बाहेर पडेल.

 

शरीरात खराब कोलेस्ट्रॉलचे प्रमाण (Bad Cholesterol Level) किती असावे?

 

२० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिलांमध्ये एलडीएल (LDL cholesterol) म्हणजेच बॅड कोलेस्ट्रॉलची पातळी १०० मिलीग्राम एवढी असावी. ती डीएलपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. त्याच वेळी, २० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या पुरुषांमध्ये, १०० मिलीग्राम / डीएलपेक्षा कमी असणे आवश्यक आहे.

या गोष्टी खाल्ल्याने बॅड कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण होते (Eating These Things Helps Control Bad Cholesterol).

– आवळा हे अत्यंत चांगले फळ आहे. जर आपण ते जर रोज एक खाल्ले तर ते आपल्या कोलेस्ट्रॉलची पातळी (Cholesterol Level) संतुलित ठेवेल. दररोज एक आवळा खाण्याचा प्रयत्न करा.

 

याशिवाय जिरे, धणे आणि बडीशेप यांचाही आहारात समावेश करू शकता. यामुळे तुमच्या कोलेस्ट्रॉलची पातळीही नियंत्रणात राहील.

 

– लसूणही तुम्ही खाऊ शकता. यामुळे तुमच्या कोलेस्टेरॉलची पातळीही नियंत्रणात राहील.
याशिवाय दररोज तुम्ही आहारात लिंबाचा समावेश करता. हे खराब कोलेस्ट्रॉल बाहेर पडते.

 

– या व्यतिरिक्त तुम्ही दररोज आपल्या आहारात आल्याचाही समावेश करू शकता. हे आपल्या शरीरात जमा झालेले खराब कोलेस्ट्रॉल बाहेर काढते.
एकूणच या औषधी वनस्पतींचा आहारात समावेश करायलाच हवा.

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

 

Web Title :- Cholesterol Level | indian herbs and spices can manage cholesterol level naturally ayurveda expert

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Anti Corruption Bureau (ACB) Mumbai | लाचेचे 3500 रुपये घेऊन पोलीस उपनिरीक्षक फरार, अ‍ॅन्टी करप्शनकडून शोध मोहिम

 

Former MLA Mohan Joshi | ‘माजी मंत्री जावडेकर, खासदार बापट, महापौर मोहोळ यांना अकार्यक्षम लोकप्रतिनिधी पुरस्कार द्यावा’; नदी सुधार योजना ही स्टंटबाजी – माजी आमदार मोहन जोशी

 

PF New Rules | मोठी बातमी ! 1 एप्रिलपासून PF अकाऊंटवर सुद्धा लागणार टॅक्स, जाणून घ्या कुणावर होणार परिणाम