चौकीदार की दाढी में तिनका : आयएलएफएस प्रकरणावरून राहुल गांधींचा मोदींना टोला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

कर्जामुळे अडचणीत आलेल्या आयएलएफएस कंपनीला वाचविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे प्रयत्न सुरू असून यावरुन काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी सरकारला लक्ष्य केले आहे. आयएलएफएसला वाचवण्यासाठी सार्वजनिक पैशांचा वापर मोदी करत आहेत, असा आरोप त्यांनी केला आहे. आयएलएफएसवर सुमारे ९१ हजार कोटींचे कर्ज आहे. या समूहाला वाचवण्यासाठी पंतप्रधान मोदी हे बेल आऊट पॅकेज देणार आहेत. यासाठी भारतीय जीवन विमा महामंडळाचा (एलआयसी) पैसा वापरला जाणार असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’eb690b12-c52d-11e8-b470-3d8493eae103′]

मोदीजी, आपकी चहेती निजी कम्पनी आयएलएफएस डूबने वाली है। आप एलआसी का पैसा लगाकर उसे बचाना चाहते हो। क्यों? एलआयसी देश के भरोसे का चिन्ह है। एक-एक रुपया जोडक़र लोग एलआसी की पॉलिसी लेते हैं। उनके पैसे से जालसाजों को देकर क्यों बचाते हो? कहीं आपके लिए आयएलएफएस का मतलब आय लव्ह फायनान्सिएल स्कॅम तो नाही? असे ट्वीट राहुल गांधी यांनी केले आहे. लाइट, कॅमेरा, स्कॅम असे शिर्षक या ट्वीटला राहुल यांनी दिले आहे. यामुळे राफेल घोटाळ्यानंतर आणखी एका प्रकरणावरून मोदींना घेरण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला आहे.

माझ्याबद्दल अपशब्द काढा पण, सरदार पटेल यांच्याबाबत भाष्य नको : मोदी

२००७ मध्ये मोदी जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते. तेव्हा आयएलएफएसला ७० हजार कोटी रुपयांचा गिफ्ट सिटी प्रोजेक्ट दिला होता. या योजने अंतर्गत आजपर्यंत काहीच का झालेले नाही. मोदी आता त्याच कंपनीला भारतीय जीवन विमा महामंडळ (एलआयसी) आणि स्टेट बँकेच्या माध्यमातून दिलासा देण्याचा प्रयत्न करत आहेत. आयएलएफएसचा अर्थ आय लव्ह फायनान्सिएल स्कॅम्स असे म्हणत चौकीदार की दाढी में तिनका, असा टोला राहुल गांधींनी लगावला आहे.

[amazon_link asins=’B0724ZQDYX’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’fe0b173a-c52d-11e8-a400-2d0914ac73cf’]

लाइट, कॅमेरा, स्कॅम असे शिर्षक असलेल्या या ट्वीटमध्ये दोन सीन नमुद केले आहेत. सीन १ : २००७, उच मोदी आयएल अ‍ॅण्ड एफएस कंपनी को ७०,००० करोड का प्रोजेक्ट गिफ्ट सिटी देते हैं। आजतक कुछ काम नहीं। जालसाजियाँ आईं सामने। सीन २: २०१८, झच मोदी एलआसी-एसबीआय में लगे जनता के पैसे से ९१००० करोड़ की कर्जदार आयएल अ‍ॅण्ड एफएस को बेलआउट दे रहे हैं। चौकीदार की दाढ़ी में तिनका, असे या ट्वीटमध्ये म्हटले आहे.