Choreography Festival 2022 | ‘कोरियोग्राफी फेस्टिव्हल’ संपन्न ! नुपूर दैठणकर व आदिती भागवत यांचा नेत्रदीपक नृत्यविष्कार

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Choreography Festival 2022 | नृत्य कला मंदिराच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित ‘नृत्योत्सव 22’ चा समारोप ‘बाजी’ फेम नुपूर दैठणकर (Nupur Daithankar) (भरतनाट्यम) व अभिनेत्री नृत्यांगना आदिती भागवत (Aditi Bhagwat) (कथक) यांचा बहारदार नृत्याने संपन्न झाला. तसेच यानिमित्त शास्त्रीय नृत्यावर आयोजित ‘कोरियोग्राफी फेस्टिव्हल’मध्ये (Choreography Festival 2022) ही पुण्यातील (Pune) 6 नामांकित नृत्य संस्थांचा नृत्य कलावंतांनी कथक, भरतनाट्यम, ओडीशी नृत्यविष्कार सादर करून अविस्मरणीय पद्धतीने ‘जागतिक नृत्य दिन’ साजरा केला.

 

 

बालगंधर्व रंग मंदिर (Balgandharva Rang Mandir) येथे संपन्न झालेल्या शास्त्रीय नृत्यावर आधारित ‘कोरियोग्राफी फेस्टिव्हल’मध्ये नृत्य कलामंदिरच्या अध्यक्षा व संयोजिका तेजश्री अडीगे (Tejashree Adige) यांनी सर्वांचे स्वागत व प्रास्ताविक केले. ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) आणि ज्येष्ठ कथक नृत्यांगना व अभिनेत्री शर्वरी जेमनीस (Sharwari Gemnis) यांनी आवर्जून उपस्थित राहून सर्व कलावंतांना शुभेच्छा दिल्या. (Choreography Festival 2022)

 

या ‘कोरिओग्राफी महोत्सवात’ आर्टीट्यूड पुणे, नंदकिशोर कल्चरल सोसायटी (Nandkishore Cultural Society), कलावर्धिनी डान्स कंपनी (Kalavardhini Dance Company), नुपूर नाद डान्स अकॅडमी (Nupur Naad Dance Academy), शर्वरी जेमनिस डान्स कंपनी (Sharvari Geminis Dance Company) आणि आकांक्षा ओडिसी नृत्यालय (Akanksha Odyssey Dance) या नृत्य संस्थामध्ये सहभागी झाल्या. आर्टीट्यूड पुणे संस्थेच्या स्मिता महाजन (Smita Mahajan) यांच्या नृत्याने या ‘कोरिओग्राफी महोत्सवा’ची सुरुवात झाली.

 

 

 

आर्टीट्यूड पुणे संस्थेच्या नृत्य कलावंतांनी भरतनाट्यम नृत्यविष्कार सादर केला. त्यामध्ये मृण्मयी भिडे (Mrinmayi Bhide), निवेदिता बडवे (Nivedita Badve), कीर्ती सतीश (Kirti Satish), स्नेहल कळमकर (Snehal Kalmakar) आणि अपूर्वा कुलकर्णी (Apoorva Kulkarni) या नृत्यांगना सहभागी झाल्या. नंदकिशोर कल्चरल सोसायटीच्या राजश्री धोंगडे (Rajshri Dhongade), अनुजा भातखंडे (Anuja Bhatkhande), जुई कुलकर्णी (Jui Kulkarni), अक्षता मोहिते (Akshata Mohite) आणि अबोली नाईक (Aboli Naik) कलावंतांनी कथक नृत्यविष्कार सादर केला. कलावर्धिनी डान्स कंपनीच्या अरुंधती पटवर्धन (Arundhati Patwardhan), सागरिका पटवर्धन (Sagarika Patwardhan), अनुजा हेरेकर (Anuja Herekar), सायली काणेया (Sayali Kaniya) नृत्य कलावंतांनी भरतनाट्यम नृत्यविष्कार सादर केला.

 

नुपूर नाद डान्स अकॅडमीच्या सानिका पोफळे (Sanika Pophale), तन्वी पाटणकर (Tanvi Patankar), वैष्णवी पुणतांबेकर (Vaishnavi Puntambekar), राजलक्ष्मी बगाडे (Rajalakshmi Bagade), सई अभ्यंकर (Sai Abhyankar) आणि श्रुती अंबपकरया (Shruti Ambapakarya) नृत्य कलावंतांनी भरतनाट्यम नृत्यविष्कार सादर केला. शर्वरी जोमिनीस (Sharwari Jominis) डान्स कंपनीच्या जुई सगदेव (Jui Sagdev), वैष्णवी देशपांडे (Vaishnavi Deshpande), सिमरन पवार (Simran Pawar), अनुष्का जोशी (Anushka Joshi), आलापिनी निसळ (Alapini Nisal) आणि आर्या फणसाळकर (Arya Phansalkar) कलावंतांनी कथक नृत्यविष्कार सादर केला आणि आकांक्षा ओडिसी नृत्यालयाच्या गौरी शुक्ला (Gauri Shukla), पूजा काळे (Pooja Kale), नयनी चौधरी (Nayani Chaudhary) या कलावंतांनी ओडीशी नृत्यविष्कार सादर केला. आपल्या पारंपारिक शास्त्रीय संरचानांचे सादरीकरण त्यांनी लयबद्धतेने केले व त्यांच्या नेत्रदीपक समूह नृत्यांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.

 

 

या ‘नृत्योत्सव 22’ ची सांगता पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन, घोले रोड येथे ‘बाजी’ फेम नृत्यांगना नुपूर दैठणकर (भरतनाट्यम) आणि अभिनेत्री नृत्यांगना आदिती भागवत (कथक) त्यांचे बहारदार नृत्याने झाली. नुपूर दैठणकर प्रसिद्ध भरतनाट्यम् नृत्य कलाकार आणि झी मराठी बाजी फेम अभिनेत्री ह्यांनी प्रथम ‘महा गणपतीम मनसा स्मरामी’ ही गणेश वंदना सादर केली. त्यानंतर ‘शिव ही संकल्पना’ घेवून भरतनाट्यम् आपल्या शिष्यांसह सादर केले. त्याअंतर्गत अर्धनारी स्तोत्र, भो शंभो, सौंदर्य लहरी देवी अष्टरस, मीरा भजन ‘हरी गुण को भजे’ हे सादर केले. त्यांना नट्टूवांगम् वर तिचे गुरू आणि आई नृत्य गुरू डॉ. स्वाती दैठणकर (Dr. Swati Daithankar) होत्या तर गायन शिवप्रसाद मृदंगं, यशवंत हम्पिहोळी आणि बासरी संजय ह्यांनी साथ संगत केली.

प्रसिद्ध अभिनेत्री नृत्यांगना आदिती भागवत (Aditi Bhagwat) यांनी कथक नृत्यविष्कारात ताल तीन ताल सादर केला. सुरुवातीला विलंबित लयीमध्ये जयपूर घराण्याच्या रोशन कुमारी (Roshan Kumari) यांची नृत्याची पद्धत होती, त्यांची स्टाईल,
अंग रचना, संगीत भाव, त्याच प्रकारे दोन मुखी घुंघरांचा वापर पदन्यासात यांचे प्रदर्शन त्यांनी अप्रतिमतेने नृत्यातून केले.
तीन तालात खास बंदिशी आमद, परणजोडी आमद त्याच बरोबर पदन्यासाचे काम निकास थाट.
त्या नंतर तिश्र जातीत मध्य लय सादर केली.
त्यांचे गुरु योगेश समसी (Yogesh Samasi) यांनी बसवलेल्या नृत्यांचे प्रदर्शन करून त्यांनी सर्वांना मंत्रमुग्ध केले.
स्वप्नील भिसे (Swapnil Bhise) यांची तबल्यावरती साथ संगत होती व सारंगीतवर संगीत मिश्रा (Sangeet Mishra) यांची साथ होती.
मध्य लयीनंतर रोषन कुमारींचा दृत लयीचे सादरीकरण केले.
त्यामध्ये सत्र पल्ली, लमछड चक्रधार सादर झाले. कार्यक्रमाची सांगता द्रौपदीच्या वस्त्र हरणच्या गतभावानी सादर झाली.
गतभावात एकच नर्तक वेगवेगळी पात्र एकटा सादर करतो.
द्रौपदीच्या वस्त्रहरणची गत नृत्यांगना आदिती भागवत यांनी तबला आणि नगम्या वर सादर केली.

 

 

नृत्य कला मंदिरातर्फे आयोजित शास्त्रीय नृत्यावर आधारित ‘कोरियोग्राफी फेस्टिव्हल’ (Choreography Festival 2022)
आणि ‘बाजी’ फेम नृत्यांगना व अभिनेत्री नुपूर दैठणकर व ज्येष्ठ अभिनेत्री नृत्यांगना आदिती भागवत यांच्या
नृत्याविष्कारांना कला रसिकांनी मोठा प्रतिसाद दिला याबद्दल नृत्य कला मंदिराच्या
अध्यक्षा व संयोजिका नृत्यांगना तेजश्री अडिगे (Tejashree Adige) यांनी सर्वांचे आभार मानले.
नीरजा आपटे (Neerja Apte) यांनी सर्व कार्यक्रमाचे सूत्र संचालन केले.

 

 

Web Title :- Choreography Festival 2022 | Choreography Festival concludes ! Spectacular dance discovery by Nupur Daithankar and Aditi Bhagwat

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा