10 वी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची ‘उत्‍तम’ संधी, CISF मध्ये 914 जागांसाठी भरती, जाणून घ्या प्रक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तुम्ही जर सरकारी नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे. सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्योरिटी फोर्स (CISF) मध्ये काँस्टेबल पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. यासाठी 10 वी पास उमेदवारी देखील अर्ज करु शकतात. ही अर्ज प्रक्रिया 23 सप्टेंबरपासून सुरु झाली आहे. जे उमेदवार काँस्टेबल पदासाठी अर्ज करु इच्छितात त्यांना CISF च्या cisfrectt.in या आधिकृत वेबासाइटला भेट द्यावी लागेल. यात 914 काँस्टेबल पदांसाठी भरती करण्यात येणार आहे.

पात्रता –
कोणत्याही मान्यता प्राप्त संस्थेतून 10 वी पास असणे आवश्यक

निवड प्रक्रिया –
उमेदवारांना PET/PST, डॉक्यूमेंटेशन आणि ट्रेड टेस्ट द्यावी लागेल. याशिवाय लेखी स्वरुपाची परिक्षा आणि वैद्यकीय तपासणी करण्यात येईल.

या रिक्त पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना पुढील प्रक्रियेनुसार अर्ज करता येईल.

असा करा अर्ज –
1.
CISF च्या आधिकृत वेबसाइटला म्हणजेच cisfrectt.in वर जावे लागेल.
2. तेथील आधिकृत नोटिफिकेशनवर क्लिक करुन अर्ज करता येईल.
3. त्यानंतर हा फॉर्म संबंधित अधिकाऱ्यांला पाठवावा लागेल.
4. त्याबरोबर उमेदवाराला 100 रुपये परिक्षा शुल्क देखील पाठवावे लागेल.

उमेदवाराने आपला अर्ज डोमिसाइलच्या आधारे भरावा. फॉर्म भरताना तो आपल्याच राज्याचा आहे का ते पाहावे, इतर राज्याचा फॉर्म भरला तर फॉर्म स्वीकारला जाणार नाही. तसेच चूकीच्या राज्याचा फॉर्म भरला तर अर्ज रद्द होऊ शकतो. या परिक्षेसंबंधित कॉल लेटर किंवा अ‍ॅडमिट कार्ड, डॉक्यूमेंटेशन, ट्रेड टेस्ट, लेखी परिक्षा आणि मेडिकल परिक्षेसंबंधित माहिती CISF च्या आधिकृत वेबसाइटवर उपलब्ध होईल.

Visit – policenama.com