CM Eknath Shinde | मोदींपेक्षा एकनाथ शिंदे प्रभावी, बीकेसीवर गर्दी जमविण्याचा पंतप्रधानांचा विक्रम मोडला, पोलिसांची आकडेवारी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिंदे गटाच्या (Shinde Group) बीकेसीवरील दसरा मेळाव्याने (Dasra Melava 2022) गर्दीचा विक्रम केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी गर्दी जमवण्यात बाजी मारली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बीकेसी मैदानावर (BKC Ground) 1 लाख 25 हजार लोक आले होते. तर शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला 65 हजार शिवसैनिक (Shiv Sainik) आले होते. मुख्यमंत्री शिंदे (CM Eknath Shinde) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या सभेचाही रेकॉर्ड मोडत मोदींपेक्षा प्रभावी असल्याचे दाखवून दिले, असा दावा आता करण्यात येत आहे.

 

शिवसेनेचा (Shivsena) पारंपारिक दसरा मेळावा नेहमीप्रमाणे शिवतीर्थावर (Shivtirtha) तर बंडखोर शिंदे गटाचा मेळावा बीकेसी मैदानावर झाला. या मेळाव्याच्या गर्दीवरून विविध दावे करण्यात येत आहेत. शिंदे गटाने राज्यभरातून 1700 एसटी बसेस आणि खासगी गाड्यांमधून माणसे आणली होती. गर्दी जमविण्याच्या बाबतीत एकनाथ शिंदे प्रभावी ठरले आहेत. त्यांनी नरेंद्र मोदींचाही विक्रम मोडल्याचा दावा करण्यात येत आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या मेळाव्याला अंदाजे 1 लाख 25 हजार कार्यकर्ते (5 ते 7 हजार कमी किंवा जास्त) जमा झाले होते. याच मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाली होती. परंतु, त्यांच्या सभेला जवळपास 97 हजार कार्यकर्ते (5 ते 7 हजार कमी किंवा जास्त) उपस्थितीत होते.

 

शिवाजी पार्क मैदानावरील शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला यावेळी रेकॉर्डब्रेक गर्दी झाली.
या मैदानाची क्षमता 50 हजार इतकी आहे. पण, यंदाच्या मेळाव्याला जवळपास 65 हजार लोकांनी हजेरी लावली.
गर्दी जमवण्यामध्ये शिंदे गट सरस ठरला आहे.

 

Web Title :- CM Eknath Shinde | 1 lakh 25 thousand workers gather at bkc ground for shindes dasara melava 2022

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Registration and Stamp Duty Dept | तुकड्यातील जमिनींच्या दस्त नोंदणीबाबतचा अहवाल महसूल सचिवांकडे सादर

Arranged Marriage | अ‍ॅरेंज मॅरेजसाठी होकार देण्यापूर्वी आवश्य विचारा ‘या’ 3 गोष्टी, अन्यथा करावा लागेल पश्चाताप

Heartburn | छातीत जळजळ किंवा Heartburn का होते, जाणून घ्या याची लक्षणे आणि बचावाचे उपाय