CM Eknath Shinde | ‘धर्मवीर आनंद दिघेंची ती इच्छा आज पूर्ण झाली’, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा (व्हिडिओ)

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात दहीहंडीचा उत्सव (Dahi Handi-2022) मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. दहीहंडीची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाण्यात यंदाच्यावर्षी वेगळाच उत्साह पाहायला मिळत आहे. राज्याला ठाण्यातील एक मुख्यमंत्री मिळाला म्हणून टेंभी नाक्याचे (Tembhi Naka) दिवंगत शिवसेनेचे नेते (Late Shiv Sena leader) आणि धर्मवीर आनंद दिघेंची (Dharmaveer Anand Dighe) मानाची हंडी यावेळी मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी टेंभी नाक्यावरील दहीहंडीला हजेरी लावली. यावेळी उपस्थित गोविंदांना (Govinda) संबोधित करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी एक मोठा खुलासा केला आहे.

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) म्हणाले, ठाणेकर मुख्यमंत्री व्हावा अशी धर्मवीर आनंद दिघेंची इच्छा होती आणि आज ती पूर्ण झाली.
आनंद दिघे यांच्या भगिनी अरुणाताई यांनी माझ्याजवळ बोलून दाखवली होती,
असं शिंदे म्हणाले. टेंभी नाक्यावरील दहीहंडीला गोविंदा पथकांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लावली आहे.
यावेळी बॉलीवुड अभिनेत्री श्रद्धा कपूर (Bollywood Actress Shraddha Kapoor) देखील उपस्थित होती.

एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, आज मानाच्या दहीहंडीला उपस्थित राहताना मला आणखी एका गोष्टीचा खूप आनंद होत आहे.
ठाण्याचा मुख्यमंत्री झाला पाहिजे हे धर्मवीर आनंद दिघे यांचे स्वप्न होतं.
दिघेंच्या भगिनी अरुणाताई यांनी माझ्याजवळ ही इच्छा बोलून दाखवली होती.
ते आज खरं झालं आहे म्हणजे दिघे साहेबांची काय दूरदृष्टी होती हे यातून दिसून येतं, असं ते म्हणाले.

 

राज्यातील सरकार हे जसं शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्यांचं आहे.
तसं ते गोविंदांचे देखील सरकार आहे. टेंभी नाका म्हणजे गोविंदांची पंढरी. महाराष्ट्राचा हा इतिहास, परंपरा आणि संस्कृती जोपासण्याचं काम धर्मवीर आनंद दिघे यांनी केलं.
आज प्रत्येक गोविंदा पथक टेंभी नाक्याच्या दहीहंडीला सलामी देऊन दहीहंडीला सुरुवात करतो.
आनंद दिघेंनी दहीहंडीचा उत्सव राज्यभर नेला.
त्याच गोविंदांसाठी राज्य सरकारनं तीन महत्त्वाचे निर्णय घेतले.
दहीहंडीला सार्वजनिक सुट्टी, 10 लाखाचा विमा आणि दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा देण्याचं काम आम्ही केल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

 

Web Title : –  CM Eknath Shinde | anand dighe sister told me about thane leader cm is the wish of anand dighe says eknath shinde in dahihandi

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा